Satara: उंब्रजमधील सात जणांच्या टोळीला ‘मोक्का’, दरोडा, खून, जबरी चोरीचे विविध गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 09:44 PM2023-04-11T21:44:30+5:302023-04-11T21:44:47+5:30

Satara News: खून, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अपरण, आर्म अॅक्ट अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल असलेल्या सात जणांच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Satara: A gang of seven in Umbraj has been booked for various crimes of 'mokka', robbery, murder, forced theft. | Satara: उंब्रजमधील सात जणांच्या टोळीला ‘मोक्का’, दरोडा, खून, जबरी चोरीचे विविध गुन्हे दाखल

Satara: उंब्रजमधील सात जणांच्या टोळीला ‘मोक्का’, दरोडा, खून, जबरी चोरीचे विविध गुन्हे दाखल

googlenewsNext

सातारा : सातारा जिल्ह्यातील उंब्रज, कऱ्हाडसह पुणे जिल्ह्यातील निगडी व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खून, खंडणीसाठी खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, अपरण, आर्म अॅक्ट अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल असलेल्या सात जणांच्या टोळीवर मोक्काअंतर्गत (संघटित गुन्हेगारी) कारवाई करण्यात आली आहे.

टोळी प्रमुख मयूर महादेव साळुंखे (वय ३४, रा. कालगाव, ता. कऱ्हाड), पंकज अमृत यादव (वय २७, रा. भवानवाडी, ता. कऱ्हाड), शाहरुख रफिक मुल्ला (वय ३०, रा. मसूर, ता. कऱ्हाड), सूरज सूर्यकांत जाधव (वय २८, रा. वाघेश्वर पो, मसूर, ता. कऱ्हाड), अमोल बाजीराव जाधव (वय ३१, रा. वाघेश्वर, ता. कऱ्हाड), अक्षय अनिल कोरे (वय २९, रा. ब्रम्हपुरी, मसूर, ता. कऱ्हाड), प्रकाश आनंदराव यादव (वय ३३, रा. ब्रम्हपुरी मसूर, ता, कऱ्हाड) अशी मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी जिल्ह्यात संघटितपणे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) अधिनियमान्वये कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी वरील टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित केली. या टोळीने दहशत पसरविण्यासाठी उंब्रज परिसरातील इतर गुन्हेगारांना एकत्र करून दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या आरोपींविरुद्ध पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्फतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मोक्का अंतर्गत कारवाई होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून, या सर्व संशयित आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास कऱ्हाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील हे करीत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस नाईक अमित सपकाळ, संजय देवकुळे, श्रीधर माने यांनी या आरोपींना मोक्का कारवाई होण्यासाठी सहभाग घेतला.


आतापर्यंत ९९ जणांना मोक्का..
जिल्ह्यात नोव्हेंबर २०२२ पासून सहा मोक्का प्रस्तावामध्ये तब्बल ९९ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच १६ जणांवर हद्दपारीची आणि एका व्यक्तीवर एमपीडीए (झोपडपट्टी दादा) कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे.

Web Title: Satara: A gang of seven in Umbraj has been booked for various crimes of 'mokka', robbery, murder, forced theft.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.