सातारा : एसटीच्या धडकेत तरुणाचा पाय तुटून ३५ फुटांवर पडला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 07:49 AM2024-06-25T07:49:30+5:302024-06-25T07:49:40+5:30
सूरज राजेंद्र बोडके (वय २५, रा. आरफळ, ता. सातारा) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : वाढे फाटा गावच्या हद्दीत एसटी बसने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा अक्षरश: पाय तुटून तब्बल ३५ फुटांवर जाऊन पडला. हा अपघात शनिवारी रात्री साडेनऊ वाजता झाला. सूरज राजेंद्र बोडके (वय २५, रा. आरफळ, ता. सातारा) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सातारा आगाराची गोवेहून साताऱ्याकडे एसटी बस (एमएच ०६-एस ८१३९) येत होती. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार सूरज बोडके याला एसटीने जोरदार धडक दिली. यामध्ये सूरज याचा उजवा पाय नडघीमध्ये तुटून तब्बल ३५ फुटांवर उडून पडला. या भीषण अपघातानंतर सूरज याला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आले. मात्र, प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले. याप्रकरणी एसटी चालक पांडुरंग सिदू सावंत (वय ५२, रा. जायगाव, ता. खटाव,) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.