सातारा : अण्णा हजारे यांनी भोवतालच्या लोकांचा विचार करावा : योगगुरू रामदेव बाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:36 PM2018-04-14T12:36:27+5:302018-04-14T12:36:27+5:30
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना आंदोलनासाठी मी उभं केलं होतं. अण्णा हजारे व्यक्तिगत चांगले आहेत, मात्र त्यांच्याभोवती असणाऱ्या लोकांबाबत त्यांनी विचार करावा, असा सल्ला योगगुरू रामदेवबाबा यांनी दिला.
कऱ्हाड (सातारा) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना आंदोलनासाठी मी उभं केलं होतं. अण्णा हजारे व्यक्तिगत चांगले आहेत, मात्र त्यांच्याभोवती असणाऱ्या लोकांबाबत त्यांनी विचार करावा, असा सल्ला योगगुरू रामदेवबाबा यांनी दिला.
कऱ्हाड येथे डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी आयोजित योग शिबिरात ते बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत रामदेवबाबा म्हणाले, महापुरुष हे संपूर्ण देशाचे असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी काम केलं. समाजात सामाजिक न्याय आणि समता निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले.
छत्रपती शिवाजी स्टेडियमवर तीन दिवसांचे नि:शुल्क योगचिकित्सा व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी पहिल्या दिवशीच हजारोंनी गर्दी केली होती.