सातारा : भरधाव कारचा टायर फुटल्याने सहायक पोलीस निरीक्षक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:36 PM2019-01-07T13:36:49+5:302019-01-07T13:37:51+5:30

भरधाव कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात सहायक पोलीस निरीक्षक ठार झाला. हा अपघात आशियायी महामार्ग ४७ वर वाई तालुक्यातील उडतारे हद्दीत सोमवारी पहाटे झाला. सचिन प्रताप शिंदे (वय ३४) असे ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

Satara: Assistant police inspector killed after filling a car tire | सातारा : भरधाव कारचा टायर फुटल्याने सहायक पोलीस निरीक्षक ठार

सातारा : भरधाव कारचा टायर फुटल्याने सहायक पोलीस निरीक्षक ठार

Next
ठळक मुद्देभरधाव कारचा टायर फुटल्याने सहायक पोलीस निरीक्षक ठारउडतारे हद्दीत अपघात : दोन चुलत भाऊ जखमी

सातारा : भरधाव कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात सहायक पोलीस निरीक्षक ठार झाला. हा अपघात आशियायी महामार्ग ४७ वर वाई तालुक्यातील उडतारे हद्दीत सोमवारी पहाटे झाला. सचिन प्रताप शिंदे (वय ३४) असे ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन प्रताप शिंदे यांचे मूळगाव सातारा तालुक्यातील पाटखळ आहे. वडीलांची तब्बेत ठिक नसल्याने ते सुटी घेऊन दोन चुलत भावांसमवेत मुंबईला गेले होते.

मुंबईतील काम उरकून साताऱ्यांत येत असताना सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांची गाडी उडतारे हद्दीत आली. त्यावेळी कारचा टायर अचानक फुटला. त्यामुळे नियंत्रण सुटून गाडीने पलट्या घेतल्या. यामध्ये शिंदे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर दोन भाऊ जखमी झाले. त्यांच्यावर साताºयात उपचार सुरू आहेत.

Web Title: Satara: Assistant police inspector killed after filling a car tire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.