Satara Bank Results LIVE: पाटणमधून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 11:09 AM2021-11-23T11:09:01+5:302021-11-23T11:09:53+5:30

सातारा : जिल्हा बँक निवडणूक निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर येत आहेत. ...

Satara Bank Results LIVE Home Minister Shambhuraj Desai defeated from Patan | Satara Bank Results LIVE: पाटणमधून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पराभूत

Satara Bank Results LIVE: पाटणमधून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई पराभूत

Next

सातारा : जिल्हा बँकनिवडणूक निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर येत आहेत. विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचा १ मतांनी पराभव झाला आहे. ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शिंदे यांचा पराभव केला आहे.  शशिकांत शिंदे यांना 24 तर ज्ञानदेव रांजणे यांना 25 मते मिळाली.

नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या सभागृहामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी प्रक्रिया सुरु आहे. तर आता जाणून घेवूयात कोणत्या मतदार संघात कोणाचा विजयी झाला ते लाईव्ह अपडेट मधून...

जावली प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ

उमेदवार                    मिळालेली मते
शशिकांत शिंदे              24
ज्ञानदेव रांजणे               25

पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून सत्यजितसिंह पाटणकर 58 मते मिळवून विजयी झाले आहेत. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपूत्र आहेत. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा त्यांनी पराभव केला असून त्यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना 44 तर सत्यजितसिंह पाटणकर 58 मते मिळाली.

पाटण प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ

उमेदवार                                  मिळालेली मते
शंभूराज देसाई                             44
सत्यजितसिंह पाटणकर                    58

कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून महसुल मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे 74 इतकी मते घेऊन विजयी झाले असून त्यांनी उदयसिंह पाटील यांचा 8  इतक्या मतांनी पराभव केला आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. येथील लढत पालकमंत्री बाळासाहेब पाटील विरुद्ध माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सुपूत्र उदयसिंह पाटील यांच्यात झाली होती. बाळासाहेब पाटील यांना 74 तर उदयसिंह पाटील यांना 66 मते मिळाली.

कराड प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघ

उमेदवार                        मिळालेली मते
बाळासाहेब पाटील                74
उदयसिंह पाटील                   66

कोरेगाव आणि माण प्राथमिक कृषी पतपुरवठा गट

कोरेगाव आणि माण प्राथमिक कृषी पतपुरवठा गटातील उमेदवारांना समान मते मिळाली आहेत. त्यामुळे येथे चिठ्ठी टाकून विजय उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे. कोरेगावमध्ये सुनील खत्री आणि शिवाजीराव महाडिक यांना प्रत्येकी पंचेचाळीस मते मिळालेले आहेत. येथे 90 मतदान झाले होते. शेखर गोरे आणि मनोज पोळ यांना प्रत्येकी 36 मते मिळाली आहेत. येथे एकूण 74 तर मते होती. मात्र मतदानादिवशी 72 मतदान झाले होते दोन मतदारांनी मतदान प्रक्रियेचे पाठ फिरवली होती.

खटाव सोसायटी गटात धक्तादायक निकाल लागला आहे. कारण या मतदार संघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दिलेल्या नंदकुमार मोरेंचा पराभव झाला आहे. प्रभाकर घार्गे यांनी मोरे यांचा पराभव केला आहे. नंदकुमार मोरेंना ४६ मते तर प्रभाकर घार्गे ५६ मते मिळाली आहेत.

खटाव सोसायटी गट

उमेदवार                        मिळालेली मते
नंदकुमार मोरेंना                    ४६
प्रभाकर घार्गे                       ५६ 

बँक व पतसंस्था गटात रामराव लेंभे विजयी झाले आहेत. रामराव लेंभे यांना ३०७ तर सुनील जाधव यांना ४७  मते मिळाली आहेत.

बँक व पतसंस्था गट

उमेदवार                        मिळालेली मते
रामराव लेंभे                      ३०७
सुनील जाधव यांना              ४७ 

इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात शेखर गोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रदीप विधाते यांनी गोरे यांना पराभवाची धुळ चारली. शेखर गोरे 379 मते मिळाली. तर, प्रदीप विधाते यांनी 1459 मते मिळवत गोरे यांचा मोठा फरकाने पराभव केला.

इतर मागास प्रवर्ग मतदारसंघ

उमेदवार                        मिळालेली मते
शेखर गोरे                         379
प्रदीप विधाते                    1459

महिला प्रवर्ग गट

महिला प्रवर्ग गटात राष्ट्रवादीच्या ऋतुजा पाटील व कांचन साळुंखे विजयी झाल्या आहेत. ऋतुजा पाटील यांना १४४५ व  कांचन साळुंखे यांना १२९२ मते मिळाली. त्यानी अनुक्रमे शारदादेवी कदम व चंद्रभागा काटकर यांचा पराभव केला. शारदादेवी कदम यांना ६१८ तर चंद्रभागा काटकर यांना १४१ मते मिळाली.

अकरा जागा यापूर्वीच बिनविरोध

जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी अकरा जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित दहा जागांसाठी रविवारी दि.२१ मतदान झाले. जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधून ९६ टक्के मतदान झाले आहे.

Web Title: Satara Bank Results LIVE Home Minister Shambhuraj Desai defeated from Patan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.