सातारा : दुष्काळी भांडवलीचं सौंदर्य, श्रमदानानंतर रूप पालटलं, पर्यटकांची पावले वळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 02:34 PM2018-07-03T14:34:18+5:302018-07-03T14:38:38+5:30

काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते; पण हेच सौंदर्य माणसारख्या दुष्काळी तालुक्यात पाहावयास मिळाले तर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येईल. हो आता हे घडलं आहे ते भांडवली गावात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या गावात याचा प्रत्यय येत असून, नालाबांध तुडुंब असून पाणी निळाशार जलाशयासारखे दिसत आहे.

Satara: The beauty of the drought capital, changed the form of labor, and the steps of tourists turned | सातारा : दुष्काळी भांडवलीचं सौंदर्य, श्रमदानानंतर रूप पालटलं, पर्यटकांची पावले वळली

सातारा : दुष्काळी भांडवलीचं सौंदर्य, श्रमदानानंतर रूप पालटलं, पर्यटकांची पावले वळली

Next
ठळक मुद्देदुष्काळी भांडवलीचं सौंदर्य, श्रमदानानंतर रूप पालटलं नालाबांध तुडूंब; पर्यटकांची पावले वळली

नितीन काळेल/सचिन मंगरूळे 

म्हसवड : काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते; पण हेच सौंदर्य माणसारख्या दुष्काळी तालुक्यात पाहावयास मिळाले तर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येईल. हो आता हे घडलं आहे ते भांडवली गावात. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या गावात याचा प्रत्यय येत असून, नालाबांध तुडुंब असून पाणी निळाशार जलाशयासारखे दिसत आहे. तर आता येथे पर्यटकांचीही पावले वळत असून यावर्षी दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत.

पाणी फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेली वॉटर कप स्पर्धा राज्यालाच दिशा देऊन गेली. या स्पर्धेत माण तालुक्याने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम केले आहे. या तालुक्यातीलच भांडवली गाव हे खऱ्या अर्थाने पाण्याचे भांडवल ठरले. तालुक्याची वार्षिक पावसाची सरासरी सुमारे ४५० मिलीमीटर एवढी आहे. तर आतापर्यंत भांडवली गावात २५० मिलीमीटर ऐवढा पाऊस झालेला आहे.

मोठे सहा ते सात पाऊस झाले. त्यामुळे नालाबांध, सीसीटी, डीपसीसीटी, तलावात पूर्ण पाणीसाठा झाला आहे. ओढ्यातून पाणी वाहून न जाता ते अडले गेले. त्यामुळे जागोजागी पाणी दिसत आहे. यामुळे आपण काश्मीरमध्ये असल्याचा साक्षात्कार घडत आहे.

माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडीपासून तसेच सुमारे १५ किलोमीटरवर असलेले हे गाव आहे. तब्बल १५ हून अधिक दऱ्यात पहुडलेल्या या गावात अनेक गावांची तहान भागविण्याची ताकद आहे. त्यामुळेच दरवर्षी टंचाईच्या काळात गावातून पाण्याचे टँकर भरभरून जात असतात.

मुळातच स्वत:ची गरज भागवून या गावाने माणदेशी मातीतील अनेक गावांची तहान भागवण्याचे काम केलं आहे. आजही माण तालुक्यात पाणी पोहोचविणारे टँकर याच भांडवली गावातून भरून जातात याचा सार्थ अभिमान भांडवलीकरांना वाटत आहे.

वॉटर कप स्पर्धेतील ४५ दिवसांने गावात चमत्कारच झाला. गावातील लोकांनी श्रमदान करून कामाचा प्रचंड डोंगर निर्माण केला. उद्दिष्टापेक्षा कितीतरी पटीने जास्त काम झालं अन् विश्वास बसणार नाही एवढं जबरदस्त काम निर्माण करण्यात आलं. निसर्गानेही गावाला साथ दिली. आजपर्यंत पाच-सहा वेळा पाऊस कोसळला. खोऱ्यातील आणि डोंगरमाथ्यावरील पाण्याने नालाबांध, समतल चरी भरून गेल्या.


एक दिवसाचे पावसाळी डेस्टिनेशन

येथील सौंदर्य सर्वांनाच भुरळ घालायला लावणारे असेच आहे. म्हणूनच या गावाकडे पर्यटकांचे पाय वळू लागले आहेत. पुण्या-मुंबईचे पर्यटक गावाला भेट देऊ लागले आहेत. भविष्यात संपूर्ण एका दिवसाचे पावसाळी डेस्टिनेशन म्हणून भांडवली या गावकडे पाहिले जाईल, यात शंका नाही अशीच स्थिती आहे आणि हाच भाव संपूर्ण ग्रामस्थांच्या डोळ्यांमध्ये चमकतोय.

आता फळबाग, दुग्ध व्यवसायावर भर

भांडवलीचा ५० टक्के भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे येथे कांदा, टोमॅटो, ज्वारी, गहू, बाजरी ही मुख्य पिके असायची. गेल्या चार वर्षांपूर्वी अस्तित्व संस्थेच्या माध्यमातून गाव परिसरात बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे पाणी उपलब्ध झाले. तर आताच्या जलसंधारणामुळे पाणीसाठा मुबलक झाला आहे. त्यामुळे फळबाग आणि दुग्ध व्यवसायावर भर देण्यात येणार आहे.
 

Web Title: Satara: The beauty of the drought capital, changed the form of labor, and the steps of tourists turned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.