सातारा : भाडळे खोऱ्यात जंगली प्राण्यांच्या हल्ल्यात गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 11:20 AM2018-03-03T11:20:33+5:302018-03-03T11:20:33+5:30
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील भाडळे खोेरे परिसरात असलेल्या डोंगरात जंगली प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. प्रताप विनायक घोरपडे यांची गाय होती. वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कोरेगाव (सातारा) : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील भाडळे खोेरे परिसरात असलेल्या डोंगरात जंगली प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात गाय ठार झाली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. प्रताप विनायक घोरपडे यांची गाय होती. वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कोरेगाव तालुक्यातील ओला चारा संपत आला आहे. त्यामुळे डोंगरावरील वाळलेले गवत खाण्यासाठी जनावरे घेऊन शेतकरी जात असतात. जंगली प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात शुक्रवारी रात्री गाय ठार झाली. तसेच घटनास्थळी आढळलेले पायाचे ठसेही मोठे असल्याने हल्ला करणारा प्राणी बिबट्या असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
घटनास्थळी आढळलेले पायाचे ठसे
सातारा, पाटण तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या भागात बिबट्याचे दर्शन घडत आहे. पाण्यांवर हल्ले होत असतानाच शाहूपुरी परिसरात मानवी वस्तीत प्रवेश करुन तिघांवर हल्ला केला होता. कोरेगाव तालुक्यातील चंचळी परिसरातही दोन वर्षांपूर्वी बिबट्या दिसला होता. त्यावेळी वनखात्याने पिंजरा लावला होता. पण बिबट्या हाती लागला नाही. त्यामुळे या परिसरात वावर असल्याने शेतकरी, गुऱ्यांख्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.