सातारा : एमआयडीसीतील चोरीप्रकरणी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:02 AM2018-11-16T11:02:01+5:302018-11-16T11:03:04+5:30
सातारा एमआयडीसीतील एका गोदामातून सात लाखांच्या चहा पावडरची चोरी करणाऱ्या दोघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चहा पावडरसह टेम्पो असा एकूण साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सातारा : सातारा एमआयडीसीतील एका गोदामातून सात लाखांच्या चहा पावडरची चोरी करणाऱ्या दोघांना सातारा शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चहा पावडरसह टेम्पो असा एकूण साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा एमआयडीसीतील श्री जी कंपनीच्या गोदामातून कामगार दशरथ उत्तम फडतरे (वय ३२, रा. शनिवार पेठ, सातारा) व विलास हरी गायकवाड (६१, रा. केसरकर पेठ, सातारा) या दोघांनी संगनमत करून शटरचे कुलूप उघडून गोदामातून चहा पावडरचे १६७ बॉक्स चोरले. याची किंमत ६ लाख ९७ हजार ९१५ रुपये होती. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक बी. जे. ढेकळे यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला. त्याचबरोबर चोरीसाठी वापरलेला टेम्पो ताब्यात घेण्यात आला.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक ढेकळे, हवालदार सुनील भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, धीरज कुंभार, ओमकार डुबल, शिवाजी भिसे, नीलेश गायकवाड, अमोल साळुंखे यांनी सहभाग घेतला.