Satara Bus Accident: पोलादपूर दुर्घटनेतील मृतांची नावं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 03:31 PM2018-07-28T15:31:43+5:302018-07-28T15:35:00+5:30
पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणा-या पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात भीषण अपघात झालाय. या अपघातात एक बस 600 फूट खोल दरीत कोसळली आहे.
सातारा- पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणा-या पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात भीषण अपघात झालाय. या अपघातात एक बस 600 फूट खोल दरीत कोसळली आहे. आतापर्यंत या अपघातात 33 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर सुदैवाने बसमधील एक प्रवासी बचावला. या बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे 38 कर्मचारी आणि 2 दोन चालक, क्लीनरसह एकूण 40 जण होते.
नशीब बलवत्तर असल्यानंच प्रकाश सावंत-देसाई हे या अपघातातून बालंबाल बचावले आहेत. त्यांना उपचारासाठी पोलादपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर येथील पोलीस आणि ट्रॅकर्सचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेहांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहेत. त्यांची नावंही समोर आली आहेत. राजेंद्र बंडबे, हेमंत सुर्वे, सुनील कदम, रोशन तबीब, संदीप सुवरे, प्रमोद जाधव, विनायक सावंत, गोरक्षनाथ तोंडे, दत्ताराम धायगुडे, रत्नाकर पागडे, प्रमोद शिवगण, संतोष जालगावकर, शिवदास आगरे, सचिन गिह्मवणेकर, संजय सावंत, राजेंद्र रिसबुड, सुनील साटले, रितेश जाधव, पंकज कदम, निलेश तांबे, संतोष झगडे, अनिल सावके, संदीप भोसले, विक्रांत शिंदे, सचिन गुजर, राजाराम गावडे, राजेश सावंत, सचिन झगडे, रविकिरण साळवी, संजीव झगडे, सुशय बाळ, अशी मृतांची नावं आहेत.