साताऱ्याचा उमेदवार योग्य वेळी जाहीर : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 11:39 PM2018-05-12T23:39:25+5:302018-05-12T23:39:25+5:30
सातारा : ‘सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपचा मीच उमेदवार, असे दीपक पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले असले तरी मात्र ही उमेदवारी कोणाला द्यायची, हे योग्य वेळ आल्यानंतर जाहीर केले जाईल,’ असे
सातारा : ‘सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपचा मीच उमेदवार, असे दीपक पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले असले तरी मात्र ही उमेदवारी कोणाला द्यायची, हे योग्य वेळ आल्यानंतर जाहीर केले जाईल,’ असे संदिग्ध विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने भाजपचे कार्यकर्ते भलत्याच गोंधळात पडले आहेत.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माधव भंडारी, रवींद्र अनासपुरे, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जावळीचे नेते दीपक पवार, मनोज घोरपडे, प्रभाकर साबळे, धनंजय जांभळे, मिलिंद काकडे, महेश शिंदे, प्राची शहाणे, विजय काटवटे, अमित कुलकर्णी, आप्पा कोरे आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, ‘सातारा-जावळीतील जनता शिवेंद्रसिंहराजेच्या विरोधात जनता मतदान करेल, असे नाही. साताºयाची विधानसभेची जागा भाजपला जिंकायची आहे. सातारा-जावळी मतदारसंघाचा उमेदवार कोण दीपक पवार की, अन्य कोण? हे योग्य वेळी पक्ष जाहीर करेल.’
साताºयात जनसंपर्क कार्यालय सुरू करून मते मिळणार नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने गरीब जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. तसे उपक्रम साताºयात सुरू केले पाहिजेत तरच जनता भाजपच्या पाठीशी राहील. जनसंपर्क कार्यालय २४ तास सुरू राहिले पाहिजे. मी येता-जाताना अचानकपणे भेट देईन. त्यावेळी जर जनसंपर्क कार्यालय बंद दिसले तर मग उमेदवारी बाबतीत विचार करावा लागेल, असा टोला कोणाचेही नाव न घेता लगावला.
मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सरकारची इच्छा आहे. यासाठी सरकारने मागासवर्गीय आयोग नेमला होता. येत्या काही दिवसांत आयोग आपला अहवाल न्यायालयात सादर करेल, त्यानंतर आवश्यक ती कायदेशीर लढाई सरकार ताकदीने लढेल, असे आश्वासक विधानही मंत्री पाटील यांनी केले.
धनंजय जांभळे यांच्या कामाचे कौतुक
भाजपमधील अंतर्गत वादामुळे गटनेतेपदाचा राजीनामा द्यावे लागलेल्या नगरसेवक धनंजय जांभळे यांच्या कामाचे चंद्रकांत पाटील यांनी कौतुक केले. जांभळे यांनी गेल्या दीड वर्षात शहरात चांगले काम केले असल्याचे उद्गारही त्यांनी काढले.
सातारा येथे भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेखर चरेगावकर, विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, धनंजय जांभळे, दीपक पवार उपस्थित होते.