साताऱ्याजवळ बारा लाखांचे चरस पकडले; एका संशयितास अटक

By admin | Published: November 30, 2015 12:11 AM2015-11-30T00:11:42+5:302015-11-30T01:13:41+5:30

लिंब फाट्याजवळ ‘एलसीबी’च्या गस्ती पथकाची कारवाई

Satara caught near twelve lakhs of herds; A suspect arrested | साताऱ्याजवळ बारा लाखांचे चरस पकडले; एका संशयितास अटक

साताऱ्याजवळ बारा लाखांचे चरस पकडले; एका संशयितास अटक

Next

सातारा : येथून जवळच असलेल्या लिंब फाट्याजवळ संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या तरुणाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) गस्ती पथकाला ४५० ग्रॅम चरस सापडले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दि. ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जप्त केलेल्या चरसची सरकारी किंमत ९० हजार रुपये असली, तरी किरकोळ बाजारभावानुसार ती तब्बल १२ लाख रुपये असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. नंदकुमार मोहन भिलारे (वय ३०, रा. शेते, ता. जावळी) हा शनिवारी दुपारी लिंब फाट्याजवळील एका महाविद्यालयाच्या समोर महामार्गावर मोटारसायकल लावून उभा होता. त्याचवेळी गुन्हे शाखेच्या गस्ती पथकाकडून महामार्गावर संशयास्पद व्यक्तींची तपासणी सुरू होती. पोलिसांनी भिलारेची चौकशी केली असता, तो चाचपडत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी त्याची झडती घेतली, तेव्हा त्याच्या पिशवीत चरसचा ४५० ग्रॅम वजनाचा गोळा पोलिसांना सापडला.भिलारेची अधिक चौकशी केली असता, महेंद्र बाळू भिलारे (मूळ रा. शेते) याने हा ऐवज पंधरा ते वीस दिवसांपूर्वी आपल्याला पाठविला असल्याचे त्याने सांगितले. महेंद्र भिलारे हा सशस्त्र सेनादलात कार्यरत आहे. नंदकुमार भिलारे हा चरस कोणाला विकणार होता, यामागे मोठी साखळी कार्यरत आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक रमेश गर्जे, सहायक फौजदार पानसे आणि पृथ्वीराज घोरपडे, मोहन घोरपडे, विजय शिर्के, विजय कांबळे, रूपेश कारंडे, शरद बेबले, स्वप्निल शिंदे आदींनी ही कारवाई केली. नंदकुमार भिलारेची मोटारसायकल (एमएच ११ डीबी ५९२९) आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. ताब्यात घेतलेले चरस तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. किरकोळ बाजारात चरस सुमारे अडीच हजार रुपये प्रतितोळा दराने विकले जाते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, भिलारेला न्यायालयाने दि. ३ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Satara caught near twelve lakhs of herds; A suspect arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.