सातारा : दोन हजार पणत्या पेटवून अनोखी दिवाळी साजरी, जयहिंद ग्रुपचे दीपोत्सवातून प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 05:16 PM2018-11-10T17:16:42+5:302018-11-10T17:18:22+5:30
सातारा : सालाबादप्रमाणे यावर्षी साताऱ्यातील जयहिंद ग्रुपच्या वतीने सुमारे दोन हजार पणत्या पेटवून आगळा-वेगळा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या ...
सातारा : सालाबादप्रमाणे यावर्षी साताऱ्यातील जयहिंद ग्रुपच्या वतीने सुमारे दोन हजार पणत्या पेटवून आगळा-वेगळा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी कायद्याचा सन्मान करुयात असा संदेश देण्यात आला. साताऱ्यातील वेताळबा मैदानात हा सोहळा पार पडला.
दिवाळी म्हणजे अंधकार दूर करणाऱ्या दिव्यांचा सण. परंतू चालू घडीला दिवाळी अन फटाके हे एक चुकीच समिकरण होऊन बसल आहे. त्यामुळे होणारे प्रदूषण, निसर्गाची हानी याचा कोणीही विचार करत नाही. याबाबत जागृती व्हावी म्हणून साताऱ्यातील जयहिंद ग्रुपने २००७ पासून या दीपोस्तवाची सुरूवात केली. यंदा जयहिंद ग्रुपच्या दीपोस्तवाचे हे बारावे वर्ष होते.
या कार्यक्रमांतर्गत वेताळबा मैदान येथे भव्य अशी रांगोळी काढण्यात आली व त्यावर सुमारे दोन हजार पणत्या पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नुकतेच न्यायालयाने फटाक्यांच्या वापरावर नियंत्रण यावे म्हणून वेळेचे बंधन घातले.
मंडळाने या निर्णयाचे स्वागत म्हणून यंदाच्या दिपोत्सवातून पर्यावरण रक्षणासाठी कायद्याचा सन्मान करुयात असा संदेश दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष दत्तू धबधबे, बिपीन दलाल, निलेश पंडीत, स्वप्नील शहा यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.