सातारा : कार विकण्याचा बनाव करत डॉक्टरकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:17 PM2018-03-09T13:17:24+5:302018-03-09T13:17:24+5:30

क्विकर अ‍ॅपवर जुनी कार विकण्याचा बहाणा करत ९६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Satara: Cheating the doctor by making a car sell | सातारा : कार विकण्याचा बनाव करत डॉक्टरकडून फसवणूक

सातारा : कार विकण्याचा बनाव करत डॉक्टरकडून फसवणूक

Next
ठळक मुद्देकार विकण्याचा बनाव करत डॉक्टरकडून फसवणूकसातारा शहर पोलिसांत तक्रार

सातारा : क्विकर अ‍ॅपवर जुनी कार विकण्याचा बहाणा करत ९६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, सिकंदर शेखलाल शेख (वय ३२, रा. सातारारोड) यांना जुनी कार खरेदी करायची होती. म्हणून त्यांनी क्विकर या अ‍ॅपवर कार पाहत होते. त्यावेळी त्यांना डॉक्टर जगताप (पूर्ण नाव कळू शकले नाही) यांनी अपलोड केलेली कार दिसली. त्यानुसार शेख यांनी संपर्क साधला.

डॉक्टर जगताप यांनी ती कार पुणे विमानतळावरील गोदामात आहे. ती सोडवण्यासाठी ९६ हजार ५०० रुपयांचे चलन भरावे लागले. त्याप्रमाणे शेख यांनी चलनाच्या रकमेचा चेक दिला. मात्र, अद्याप कार मिळाली नाही.

तसेच त्या नंबरवर संपर्क साधला असता मोबाईल बंद आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार शेख यांनी सातारा शहर पोलिसांत दिली आहे.

Web Title: Satara: Cheating the doctor by making a car sell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.