सातारा : नेट बँकिंगद्वारे ८९ हजार रुपयांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 04:03 PM2018-11-14T16:03:46+5:302018-11-14T16:04:21+5:30
नेट बँकिंगच्या माध्यमातून एका तरुणाच्या खात्यावरून परस्पर ८९ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली.
Next
ठळक मुद्दे नेट बँकिंगद्वारे ८९ हजार रुपयांची फसवणूकशाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सातारा : नेट बँकिंगच्या माध्यमातून एका तरुणाच्या खात्यावरून परस्पर ८९ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, रामदास ज्ञानेश्वर जाधव (रा. सोनगाव तर्फ सातारा, ता. सातारा) यांच्या अॅक्सिस बँकेच्या खात्यावरून एकाने नेट बँकिंगद्वारे रविवारी रात्री परस्पर ८९ हजार १८० रुपये काढले.
हे पैसे विविध कंपन्यांच्या खात्यावर वर्ग झाल्याचा मॅसेज जाधव यांना आल्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे करीत आहेत.