सातारा : दिव्यनगरीत मारहाण व जबरी चोरी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:59 AM2018-05-07T11:59:52+5:302018-05-07T11:59:52+5:30
दिव्यनगरी, कोंडवे फाट्यावर दुचाकीवरून आलेल्या सातजणांनी रस्त्याकडेला थांबलेल्या तिघांना दांडक्याने मारहाण करत जबरी चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : दिव्यनगरी, कोंडवे फाट्यावर दुचाकीवरून आलेल्या सातजणांनी रस्त्याकडेला थांबलेल्या तिघांना दांडक्याने मारहाण करत जबरी चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, गणेश अर्जुन निकम (वय ३०, आंबेदर, ता. सातारा) हे रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोंडवे दिव्यनगरी फाट्याजवळ उभे होते.
दरम्यान, शुभम संभाजी जाधव (रा. सैदापूर), लीपकुमार ऊर्फ मजनू रामदुआल सहानी (रा. कोडंवे), अक्षय धनावडे व इतर चारजण आले. त्यांनी गणेश, आई व चुलते यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.
तसेच खिशातील पाचशे रुपये चोरले. त्याचबरोबर रस्त्याकडेला उभी असलेल्या गणेशच्या दुचाकीची मोडतोड करत २५ हजार रुपयांचे नुकसान केले.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.