Satara: हॉटेलमध्ये जेवण करून जाणाऱ्याला लुटले; तिघांच्या मुसक्या आवळल्या 

By नितीन काळेल | Published: March 16, 2024 07:21 PM2024-03-16T19:21:48+5:302024-03-16T19:23:09+5:30

सातारा : हाॅटेलमधून रात्री जेवण करुन घरी जाणाऱ्या तरुणाला अपहरण करुन लुटणाऱ्या तिघांच्या मुसक्या सातारा शहर पोलिसांनी आवळल्या. तसेच ...

Satara city police arrested three people who kidnapped and robbed the youth | Satara: हॉटेलमध्ये जेवण करून जाणाऱ्याला लुटले; तिघांच्या मुसक्या आवळल्या 

Satara: हॉटेलमध्ये जेवण करून जाणाऱ्याला लुटले; तिघांच्या मुसक्या आवळल्या 

सातारा : हाॅटेलमधून रात्री जेवण करुन घरी जाणाऱ्या तरुणाला अपहरण करुन लुटणाऱ्या तिघांच्या मुसक्या सातारा शहर पोलिसांनी आवळल्या. तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईलसह ७५ हजारांचा एेवज जप्त करण्यात आला आहे. तर हे लुटारु पोलिसांच्या रेकाॅर्डवरील असून सातारा तालुक्यातील रहिवाशी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ११ मार्च रोजी रात्री आठच्या सुमारास एक तरुण साताऱ्यातील आैद्योगिक वसाहतीतील एका हाॅटेलमध्ये जेवण करुन घरी चालला होता. त्यावेळी अनोळखी तिघांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून त्याला जानाई मळाई डोंगराच्या पायश्याला नेले. त्या ठिकाणी अंधारात त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल जबरदस्तीने घेतला व पळून गेले. त्यानंतर तरुणाने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल, पोलिस उप अधीक्षक राजीव नवले यांनी शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांना गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली. त्यानंतर निरीक्षक म्हस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करुन लुटारुंचा शोध घेण्याची सूचना केली. त्यावेळी संशयित हे पोलिसांच्या रेकाॅर्डवरील असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर त्यांना कारंडवाडी, सोनवडी परिसरातून ताब्यात घेतले. विनीत संजय कदम (वय २१, रा. झेंडा चाैक नवीन आैद्योगिक वसाहत सातारा), मनोहर विठ्ठल भोसले (वय २३, रा. कारंडवाडी बसथांब्याशेजारी, सातारा) आणि धीरज धर्मेंद्र बोधे (वय १९, रा. सोनवडी, ता. सातारा) अशी आहेत.

पोलिस निरीक्षक म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, गोसावी, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, सुशांत कदम, अजित माने तसेच सायबर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

निष्पन्न झाल्यानंतर धरपकड..

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांना शोधण्यासाठी तत्काळ सूत्रे हलविली. त्यासाठी विविध पातळीवर माहिती घेण्यात आली. चोरी जेथे झाली आहे, त्याच परिसरातील संशयित असण्याची शक्यता धरुन तपास सुरू केला. त्यावेळी लुटारू हे पोलिसांच्या रेकाॅर्डवरील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांची धरपकड करण्यात आली. पोलिसांनी चोरीतील मोबाइल, रोख रक्कम आणि आरोपींची दुचाकी असा ७५ हजार रुपयांचा एेवज जप्त केला आहे.

Web Title: Satara city police arrested three people who kidnapped and robbed the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.