सातारा : शिक्षिकेवर स्टाफरूममध्ये अतिप्रसंगाचा प्रयत्न, दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 02:15 PM2018-07-06T14:15:29+5:302018-07-06T14:18:27+5:30
सातारा शहरानजीक असणाऱ्या एका माध्यमिक शाळेतील शिक्षिकेवर स्टाफरूममध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : सातारा शहरानजीक असणाऱ्या एका माध्यमिक शाळेतील शिक्षिकेवर स्टाफरूममध्ये अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदेश रघुनाथ कळबटे (रा. खंडोबामाळ, सातारा) व चंद्रकांत रतन रोकडे (रा. जानाई मळाई कॉलनी, चंदननगर, सातारा) अशी सशंयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी की, पीडित शिक्षिका शाळेमध्ये जिन्यावरून स्टाफरूममध्ये जात होती. त्यावेळी संदेश कळबटे यांनी तिचा हात ओढून तिला चंद्रकांत रोकडे यांच्या संगनमताने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर शाळेच्या निकालाच्या दिवशी आरटीई कायदामध्ये अडकविण्याचा धमक्या देणे, अश्लील भाषेचा वापर करणे, अॅट्रसॅसिटी कायद्याच्या खोट्या धमक्या दिल्या.
तसेच तळमजल्यावरून पहिल्या जिन्यात धक्का देऊन जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस फौजदार राजू शेख करीत आहेत.