सातारा :  कोयनेतील विसर्ग कमी करण्यात आला, दरवाजे चार फुटांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 02:02 PM2018-08-20T14:02:26+5:302018-08-20T14:16:16+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असला तरी जोर कमी झाला असून, कोयना धरण परिसरात सोमवारी सकाळपर्यंत ४० मिलीमीटर पाऊस झाला होता. तर धरणात १०१.२५ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

Satara: Connection was reduced, four feet above the door | सातारा :  कोयनेतील विसर्ग कमी करण्यात आला, दरवाजे चार फुटांवर

सातारा :  कोयनेतील विसर्ग कमी करण्यात आला, दरवाजे चार फुटांवर

Next
ठळक मुद्देकोयनेतील विसर्ग कमी करण्यात आला, दरवाजे चार फुटांवर धरणक्षेत्रात पावसाचा जोर मंदावला

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असला तरी जोर कमी झाला असून, कोयना धरण परिसरात सोमवारी सकाळपर्यंत ४० मिलीमीटर पाऊस झाला होता. तर धरणात १०१.२५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. पाऊस कमी झाल्याने धरणाचे दरवाजे पाच फुटांवरून चार फुटांपर्यंत खाली आणण्यात आले आहेत.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत अनेक दिवस पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील असणारी प्रमुख धरणे भरल्यातच जमा आहेत. सोमवारी सकाळपर्यंत कोयना धरण परिसरात ४० मिलीमीटर पाऊस झाला. धरणात १०१.२५ टीएमसी इतका पाणीसाठा झाला.

धरणात ३८,३७३ क्युसेक पाण्याची आवक होत असून, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सकाळी सातच्या सुमारास धरणाचे दरवाजे पाच फुटांवरून चार फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. दरवाजातून ३३,२१८ तर पायथा वीजगृहातून २१०० असे मिळून ३५,३१८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सोमवारी सकाळपर्यंत धोम धरणात १२.५६ टीएमसी पाणीसाठा होता. तर कण्हेरमध्ये ९.५७, बलकवडी ३.८७ तर तारळी धरणात ५.३८ टीएमसी साठा होता. तारळी धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.

धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्ये

धोम ०८/५५२
कोयना ४० /४६१६
बलकवडी २७ /२२९६
कण्हेर ०३ /६३६
उरमोडी १६ /१०४३
तारळी २८ /१९३९

Web Title: Satara: Connection was reduced, four feet above the door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.