Satara Crime: वयोवृद्ध दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवत मारहाण करुन लुटले, जखमी महिलेवर उपचार सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 07:25 PM2023-05-08T19:25:46+5:302023-05-08T19:26:06+5:30

राजीव पिसाळ पुसेसावळी : खटाव तालुक्यातील चोराडे येथील नांगरे मळा येथे राहत असलेल्या जोडप्यास रविवारी रात्री चोरट्यांनी चाकूचा धाक ...

Satara Crime: An elderly couple was beaten and robbed at knifepoint, the injured woman is undergoing treatment | Satara Crime: वयोवृद्ध दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवत मारहाण करुन लुटले, जखमी महिलेवर उपचार सुरू 

Satara Crime: वयोवृद्ध दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवत मारहाण करुन लुटले, जखमी महिलेवर उपचार सुरू 

googlenewsNext

राजीव पिसाळ

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील चोराडे येथील नांगरे मळा येथे राहत असलेल्या जोडप्यास रविवारी रात्री चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत व मारहाण करून लुटले. यामध्ये हिराबाई भिकू पिसाळ (वय ७५) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर पुसेसावळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. घरामध्ये असणारी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा अंदाजे ६२ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चोराडे येथे रविवारी (दि. ७) रात्री अकरा वाजता चोरट्यांनी हिराबाई भिकू पिसाळ यांच्या घराच्या दरवाजाला धक्का देऊन आतील कडी उचकटून प्रवेश केला. एकाने हाताने चाकूचा धाक दाखवून हिराबाई यांच्या कपाळावर चाकू मारून व कानातील फुले तोडून जखमी केले.

एका चोरट्याने हिराबाई यांचे पती भिकू पिसाळ (८०) यांना मारहाण केली व घरातील २७ हजार रूपये, एक सोन्याची बोरमाळ, सोन्याची दोन कर्णफुले, सोन्याचे एक मणी मंगळसूत्र असा ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, औंधचे सहायक पोलिस निरीक्षक डी. पी. दराडे यांनी भेट दिली. पुसेसावळी दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक जी. बी. केंद्रे तपास करीत आहेत.

कर्णफुले ओढल्याने कानाला इजा

हिराबाई पिसाळ यांच्या कानातील सोन्याच्या फुलांवर चोरट्यांनी नजर गेली. तेव्हा एकजण कानातील फुले काढू लागला. एक निघाले. मात्र दुसरे फुल निघाले नाही. यामुळे चिडलेल्या चोरट्यांनी दागिना ओढून काढण्याचा प्रयत्न केला. यात कानाला इजा झाली असून त्याला टाके घालावे लागले आहेत.

Web Title: Satara Crime: An elderly couple was beaten and robbed at knifepoint, the injured woman is undergoing treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.