Satara Crime: भागीदारीच्या आमिषाने एकाची नऊ लाखांची फसवणूक

By दीपक शिंदे | Published: March 18, 2023 02:16 PM2023-03-18T14:16:35+5:302023-03-18T14:16:57+5:30

कंपनीत होणाऱ्या नफ्यातील ५० टक्के रक्कम देण्याचेही दाखवले आमिष

Satara Crime: Fraud of 9 lakhs by one on the lure of partnership | Satara Crime: भागीदारीच्या आमिषाने एकाची नऊ लाखांची फसवणूक

Satara Crime: भागीदारीच्या आमिषाने एकाची नऊ लाखांची फसवणूक

googlenewsNext

फलटण : भागीदारीच्या आमिषाने पुण्यातील एका भामट्याने एकाची ९ लाखांची फसवणूक केली असून याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १९ ऑगस्ट २०२१ ते १६ मार्च २०२३ अखेर सुनील गौतम सरोदे (रा. औंध, पुणे) याने शुभम शिवाजी पवार (रा. आसू, ता. फलटण) यांना कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मी चालू करणार असून त्या कंपनीत गुंतवणूकदार म्हणून ९ लाख रुपये गुंतवणूक करण्याचे सांगितले. ही रक्कम तुम्हाला पाच महिन्यांत परत देऊ, तसेच कंपनीत होणाऱ्या नफ्यातील ५० टक्के रक्कम देतो, असे आमिष दाखवून पवार यांच्याकडून ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात ९ लाख रुपये सरोदे याने स्वीकारले. 

यानंतर गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता सरोदे याने पवार यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबतची नोंद फलटण शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

Web Title: Satara Crime: Fraud of 9 lakhs by one on the lure of partnership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.