सातारा : वाकलेल्या विद्युत पोलाखाली रोजचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 04:04 PM2018-06-27T16:04:55+5:302018-06-27T16:07:23+5:30
कोरेगाव तालुक्यातील साप येथील बुधावले वस्ती मधील वीज वितरणचा विद्युत पोल घराच्या दिशेला वाकला असल्याने घरासह कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबतची तक्रार वारंवार रहिमतपूर वीज कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्याकडे करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील साप येथील बुधावले वस्ती मधील वीज वितरणचा विद्युत पोल घराच्या दिशेला वाकला असल्याने घरासह कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबतची तक्रार वारंवार रहिमतपूर वीज कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्याकडे करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
बुधावले वस्ती येथील गणपत बुधावले यांच्या घरासमोर रस्त्याच्या बाजूला सिमेंटचा विद्युत पोल उभा आहे. गेल्या वर्षभरापूर्वी पावसाळ्यात विद्युत पोल घराच्या दिशेने वाकला सिमेंटचा पोल असल्यामुळे त्याला मधून तडेही गेले आहेत कधीही विद्युत पोल मधून मोडू शकतो किंवा घरावर पडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सदर धोकादायक पोल तत्काळ बदलावा, अशी मागणी गणपत बुधावले यांनी ग्रामपंचायत साप व रहिमतपूर वीज वितरण कार्यालयाकडे वारंवार केली आहे. मात्र वीज वितरणचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत.
नुकत्याच दोन तीन मुसळधार पावसामुळे सदर विद्युत पोल आणखी आगाराच्या दिशेने वाकलेला आहे तो कधीही पडू शकतो. वीज पूल कोसळून जीवित हानी व घराचे नुकसान झाल्यास त्याला वीज वितरणचे संबंधित अधिकारी जबाबदार असतील. तरी धोकादायक वीज पोल तातडीने बदलावा, अशी मागणी गणपत बुधावले यांनी केली आहे.