सातारा : धरण परिसरात जोर मंदावला, आवक सुरूच : कोयनेत २८.१० टीएमसी साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 01:59 PM2018-06-27T13:59:17+5:302018-06-27T14:02:41+5:30
सातारा जिल्ह्यातील धरण परिसरात सुरू असणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी तिसºया दिवशी काहीसा मंदावला असलातरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. तर कोयना धरणात बुधवारी सकाळपर्यंत २८.१० टीएमसी एवढा साठा झाला होता. पश्चिम भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत.
सातारा : जिल्ह्यातील धरण परिसरात सुरू असणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी तिसऱ्या दिवशी काहीसा मंदावला असलातरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. तर कोयना धरणात बुधवारी सकाळपर्यंत २८.१० टीएमसी एवढा साठा झाला होता. पश्चिम भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत.
यावर्षी जिल्ह्यात मान्सूनने वेळेत हजेरी लावली. मात्र, काही दिवस पावसाने दडी मारली. त्यामुळे सर्वांनाच चिंता लागून राहिली होती. असे असतानाच गेल्या चार दिवसांपासून पावसाने जोर धरला होता. सोमवारपासून पश्चिम भागात संततधार सुरू होती.
महाबळेश्वर, बामणोली, कास, कोयनानगर, नवजा या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. बुधवारी मात्र पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला होता. दिवसभर हलक्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे धरणात पाण्याची मोठी आवक होऊ लागली आहे.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८८ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणसाठा २८.१० टीमएमसीवर पोहोचला आहे. तारळी धरण क्षेत्राही चांगला पाऊस सुरू असून, तेथे ४७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
साताऱ्यांत उघडीप...
सातारा शहरात बुधवारी सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती. तीन दिवस साताऱ्यात चांगला पाऊस झाला. यामुळे परिसरातील शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये
धोम ०२ (१३१)
कोयना ८८ (७३२)
बलकवडी ११ (३२३)
कण्हेर ०४ (९९)
उरमोडी १८ (१२७)
तारळी ४७ (२९४)