सातारा : वीज कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे वाड्या-वस्त्या अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:39 PM2018-10-10T12:39:46+5:302018-10-10T12:42:05+5:30
घरगुती विद्युत पुरवठा चोवीस तास व्हावा, या हेतूने शासनाने सिंगल फ्यूजची वेगळी यंत्रणा राबविली. त्यामुळे फक्त उद्योगधंदा, शेतींना लागणाऱ्या वीज पुरवठ्याला भारनियमन लागले. सिंगल फ्यूजची यंत्रणा राबविताना काही भाग जोडला गेला नव्हता, जी घरे शेतामध्ये वाड्या-वस्त्यावर होती त्यांच्यासाठी थ्री फ्यूजऐवजी टू फ्ूयजची वीजपुरवठा कायम ठेवल्याने शेतीची वीज बंद राहून घरगुती उपलब्ध होत होती.
दहिवडी : घरगुती विद्युत पुरवठा चोवीस तास व्हावा, या हेतूने शासनाने सिंगल फ्यूजची वेगळी यंत्रणा राबविली. त्यामुळे फक्त उद्योगधंदा, शेतींना लागणाऱ्या वीज पुरवठ्याला भारनियमन लागले. सिंगल फ्यूजची यंत्रणा राबविताना काही भाग जोडला गेला नव्हता, जी घरे शेतामध्ये वाड्या-वस्त्यावर होती त्यांच्यासाठी थ्री फ्यूजऐवजी टू फ्ूयजची वीजपुरवठा कायम ठेवल्याने शेतीची वीज बंद राहून घरगुती उपलब्ध होत होती.
मात्र, गेल्या दोन दिवसांत सिंगल फ्यूजची वीज तशीच ठेवून सरसकट भारनियमन केल्याने थ्री फ्यूजच्या कनेक्शनवर घरगुती वीज रात्री सहा ते बारा बंद होत असून, वस्त्यांवरील राहणाऱ्या लोकांना अंधारात रात्र काढावी लागते. माण तालुक्यात सिंगल फ्यूज वगळून थ्री फ्यूजवरील २५ टक्के कनेक्शन अंधारात आहे.
शासनाने भारनियमन करताना पूर्वीसारखी पूर्ण वीजपुरवठा बंद न करता सिंगल फ्यूजचा पुरवठा थ्री फ्यूजमधून पूर्वीसारखा कायम ठेवावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. अन्यथा तो भाग सिंगल फ्यूज कनेक्शनला जोडावा, अशी मागणी होत आहे.
गेली दोन दिवस अचानक झालेल्या भारनियमनामुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. वारंवार दहिवडी वीजवीतरण मंडळाशी संपर्क साधला असता फोन बाजूला ठेवला जात असून, कोणतीही तक्रार ऐकून घेतली जात नसल्याचे निर्दशनास आले.
पूर्वी भारनियमन होत असताना त्यातून सिंगल फ्यूज लाईट सुरू होती. त्यामुळे रानातील एकट्या घरातही लाईट असायची; पण आत्ताचे भारनियमन पूर्ण बंद होत असल्याने थ्री फ्यूज कनेक्शनवरील घरे अंधारात राहणार असून, शासनाने पूर्वीसारखा निर्णय घ्यावा व घरगुती वीज नियमित ठेवावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.
- संजय भोसले,
जिल्हा उपप्रमुख, शिवसेना