सातारा :  दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्धा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 02:42 PM2018-12-10T14:42:07+5:302018-12-10T14:43:23+5:30

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील शेंद्रेजवळ रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी महिला जागीच ठार झाली. हा अपघात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.

Satara: The death of a pedestrian killed in a wheelchair | सातारा :  दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्धा ठार

सातारा :  दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्धा ठार

Next
ठळक मुद्दे दुचाकीच्या धडकेत पादचारी वृद्धा ठारपोलीस घेत आहेत, त्या दुचाकीस्वाराचा शोध

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील शेंद्रेजवळ रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी महिला जागीच ठार झाली. हा अपघात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.

सावित्राबाई अप्पा शेंडगे (वय ६०, रा. रेडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून शेंडगे या आपल्या कुटुंबासह शेंद्रे परिसरात वास्तव्यास होत्या.

सोमवारी सकाळी त्या शेंद्रे फाट्यावरील महामार्गावरून काही कामानिमित्त निघाल्या होत्या. याचवेळी नागठाणे बाजूकडून आलेल्या दुचाकीस्वार युवकाने त्यांना जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की शेंडगे या पाच ते सहा फूट फरफटत गेल्या. त्यामुळे त्यांच्या हाता-पायाला आणि डोक्याला गंभीर जखम झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातानंतर शेंडगे यांना खासगी वाहनाने सचिन रामचंद्र बोंबसे (रा. रामनगर, सातारा) यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, ज्या दुचाकीस्वार युवकाने शेंडगे यांना धडक दिली. त्या दुचाकीस्वाराचा सातारा तालुका पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Satara: The death of a pedestrian killed in a wheelchair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.