सातारा : स्ट्रॉबेरी रोपांच्या निर्मितीत घट; दरात वाढ, लागवड अंतीम टप्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 01:09 PM2018-11-07T13:09:35+5:302018-11-07T13:12:21+5:30

महाबळेश्वर, पाचगणीसह वाई परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. याच परिसरात कमी क्षेत्रात अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकांची लागवड अंतिम टप्प्यात आली. यावर्षी रोपांच्या निर्मितीत घट झाल्याने रोपांचे दर मात्र वाढले आहेत.

Satara: Decrease in the production of strawberry plants; Increase in the price, the final stage of planting | सातारा : स्ट्रॉबेरी रोपांच्या निर्मितीत घट; दरात वाढ, लागवड अंतीम टप्यात

सातारा : स्ट्रॉबेरी रोपांच्या निर्मितीत घट; दरात वाढ, लागवड अंतीम टप्यात

Next
ठळक मुद्देस्ट्रॉबेरी रोपांच्या निर्मितीत घट; दरात वाढ, लागवड अंतीम टप्यातपावसाने लवकरच पाठ फिरवल्याने परिणाम

पसरणी : महाबळेश्वर, पाचगणीसह वाई परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. याच परिसरात कमी क्षेत्रात अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकांची लागवड अंतिम टप्प्यात आली. यावर्षी रोपांच्या निर्मितीत घट झाल्याने रोपांचे दर मात्र वाढले आहेत.

वाईसह परिसरातील शेतकरी कमी क्षेत्रात अधिक आर्थिक उत्पन्न देणारे पीक म्हणून स्ट्रॉबेरीच्या लागवडीकडे वळले आहेत. स्ट्रॉबेरीची लागवड अंतिम टप्प्यात आहे. यावर्षी मदर प्लांटपासून रोपांच्या निर्मितीत घट झाल्याने दर वाढले आहेत. रोपांच्या विक्रीतून चांगला फायदा झाला आहे. काही शेतकरी तयार रोपांची पुन्हा नवीन क्षेत्रात लागवड करतात. स्ट्रॉबेरीच्या फळांचे उत्पन्न घेतात. वाईच्या महागणपती व मेणवली धोम धरण परिसरात पर्यटक भेट देतात.

तेथून ते थंड हवेच्या पाचगणी, महाबळेश्वरला जातात. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटल्यानंतर स्टॉबेरी खरेदी हा त्यांचा मुख्य कार्यक्रम असतो. फळे बाजारात जेवढ्या लवकर विक्रीसाठी येतील तेवढा दर चांगला मिळतो. त्यामुळे शेतकरी अहोरात्र शेतांत राबत असतो. पिकासाठी खते औषधे पाणी व्यवस्थापनसाठी ठिबक स्प्रिंकलर मल्चिंग पेपर असा शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. योग्य हवामानाच्या साथीची गरज लागते.
 


यंदा लवकरच पाऊस गेल्याने रोपांना नेसर्गिक पाणी मिळाले नाही. स्प्रिंकलरने पाणी पुरवठा करावा लागला रोपांच्या निर्मितीत घट झाली. त्यामुळे रोपांचे दर चांगले राहिले
- विकास घाडगे,
स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी
 

Web Title: Satara: Decrease in the production of strawberry plants; Increase in the price, the final stage of planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.