सातारा : उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारीचा चार्ज काढला, अत्याचाराचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 04:38 PM2018-03-30T16:38:38+5:302018-03-30T16:38:38+5:30
घरकूल व शौचालय मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेले ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा चार्ज तात्पुरता काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत जगताप यांना पदभार देण्यात आला आहे.
सातारा : घरकूल व शौचालय मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप असलेले ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांचा चार्ज तात्पुरता काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत जगताप यांना पदभार देण्यात आला आहे.
उपमुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केल्यानंतर त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शासकीय अधिकाऱ्यावरच अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट बाब असल्याने भंडारी यांचा चार्ज तात्पुरता काढून घेण्यात आला आहे.
नागरिकांची कामे खोळंबली जाऊ नये म्हणून त्यांच्या जागी पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी चंद्रकांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमध्ये सध्या मार्च एडिंगची कामे सुरू असून, अधिकाऱ्यांसह व कर्मचारीही सुटीच्या दिवशी कामावर हजर आहेत.