Satara: कण्हेरमधील विसर्ग वाढणार; वाईतील महिलेचा शोध सुरूच, ठोसेघर घाटात रस्ता खचला

By नितीन काळेल | Published: July 26, 2024 10:26 PM2024-07-26T22:26:38+5:302024-07-26T22:26:54+5:30

Satara Rain News: सातारा तालुक्यातील कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास धरणातून साडे सात हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Satara: Discharge in Kanhar will increase; The search for the woman in Wai continues, the road is blocked in Toseghar Ghat | Satara: कण्हेरमधील विसर्ग वाढणार; वाईतील महिलेचा शोध सुरूच, ठोसेघर घाटात रस्ता खचला

Satara: कण्हेरमधील विसर्ग वाढणार; वाईतील महिलेचा शोध सुरूच, ठोसेघर घाटात रस्ता खचला

- नितीन काळेल
सातारा - सातारा तालुक्यातील कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रात्रीच्या सुमारास धरणातून साडे सात हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर वाई तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या महिलेचा शोध सुरूच होता. तर ठोसेघर घाटातही रस्ता खचल्याने एेकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सहा दिवसांपासून पाऊस पडत आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास पावसाचा जोर मंदावला होता. पण, दुपारपासून पुन्हा पाऊस वाढू लागला आहे. यामुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागले आहे. सातारा तालुक्यातील कण्हेर धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे धरणात येवा वाढला आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी विसर्ग वाढविण्यात येणार आहे. रात्रीच्या सुमारास सुमारे साडे सात हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार होते. त्यामुळे वेण्णा नदीच्याही पाणीपातळीतही वाढ होणार आहे. परिणामी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर वाई येथील शिल्पा प्रकाश धनावडे या किवरा ओढ्यातील पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही त्यांचा शोध सुरू होता. स्थानिक ट्रेकर्स, पालिका आणि पोलिसांच्यावतीने शोध मोहीम सुरू होती. मात्र, सायंकाळपर्यंततरी त्यांचा शोध लागला नव्हता. तर संततधार पावसामुळे सातारा तालुक्यातील ठोसेघर घाटातही रस्ता खचला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून खचलेल्या रस्त्याच्या भागात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तसेच धोक्याची जाणीव व्हावी म्हणून वाहनधारकांसाठी फलकही लावण्यात आला आहे.

बोंडारवाडीत भूस्खलन; जलवाहिनी तुटली
जावळी तालुक्यातही जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे ओढ्यांना पूर आला आहे. तसेच बोंडारवाडी येथे अतिवृष्टीमुळे भूस्खलन सुरू झाले आहे. यामध्ये जलवाहिनी तुटली. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.

Web Title: Satara: Discharge in Kanhar will increase; The search for the woman in Wai continues, the road is blocked in Toseghar Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.