सातारा जिल्हा बँक निवडणूक : मेढ्यात शिंदे आणि रांजणे कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 11:52 AM2021-11-21T11:52:30+5:302021-11-21T11:58:32+5:30

आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली हमरीतुमरी.

Satara District Bank Election Confusion among the workers in the Medha | सातारा जिल्हा बँक निवडणूक : मेढ्यात शिंदे आणि रांजणे कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

सातारा जिल्हा बँक निवडणूक : मेढ्यात शिंदे आणि रांजणे कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Next

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली आहे. यातच मेढ्यात कार्यकर्त्यांची हमरीतुमरी झाल्याचा प्रकार घडला. आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही हमरीतुमरी झाली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जावली विकास सेवा सोसायटी मतदार संघात तणावपूर्ण वातावरण असतानाच रविवारी मतदानात दिवशीच आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे विरोधी ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली. यावेळी पोलिसांच्या उपस्थितीतच एकमेकांना अपशब्द वापरणे पर्यंत मजल गेली होती. मोठा अनर्थ व्हायच्या आधीच आमदार शिंदे आणि रांजणे यांनी मध्यस्थी करून समजुतदारपणा दाखवला आणि वाद मिटवला.

मेढा येथील मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे व वसंतराव मानकुमरे आमने सामने भिडले. दोन्ही गटात यावेळी काही वेळासाठी राडा झाला. दोघांनी एकमेकांना अरे-तुरेच भाषा वापरली.

यावेळी वसंतराव मानकुमरे हे आक्रमक झाले. रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी ऋषिकांत शिंदे यांनी वसंतराव मानकुमरे व कुडाळचे प्रतापगड कारखाना संचालक मालोजीराव शिंदे यांना हातवारे करून एकमेकांना धारेवर धरले. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमदार शशिकांत शिंदे व ज्ञानदेव रांजणे दोघांनीही मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वातावरण कमालीचे तणावपूर्ण झाले.

Web Title: Satara District Bank Election Confusion among the workers in the Medha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.