फलटणमधील अतिक्रमण हटाव मोहिमेस जिल्हाधिकाऱ्यांची स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 06:16 PM2023-01-05T18:16:22+5:302023-01-05T18:17:00+5:30
नसीर शिकलगार फलटण : फलटण नगरपालिकेतर्फे शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण मोहिमेस जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली. या अतिक्रमण हटाव मोहिमेस व्यापाऱ्यांनी ...
नसीर शिकलगार
फलटण : फलटण नगरपालिकेतर्फे शहरात सुरु असलेल्या अतिक्रमण मोहिमेस जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली. या अतिक्रमण हटाव मोहिमेस व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. तर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.
नगरपालिकेतर्फे शहरात अतिक्रमण मोहिम सुरु करण्यात आली होती. ही अतिक्रमणे काढत असताना याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या नाहीत. अतिक्रमणे काढत असताना ठराविकच अतिक्रमणे काढल्याने सामान्य व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. अतिक्रमणाचा सर्वाधिक फटका गरीब व मध्यमवर्गीय दुकानदारांना बसला होता. व्यापाऱ्यांनी नगरपालिकेच्या निषेधार्थ फलटण बंद ठेवले होते. यानंतर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले होते.
जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांनी सर्व कायदेशीर बाबी व प्रक्रिया यांचा अवलंब करून तसेच सहाय्यक संचालक नगररचना सातारा यांनी अतिक्रमणाबाबत सर्वे करून अतिक्रमणे अधोरेखित केल्याशिवाय कोणतीही कारवाई करू नये, तसेच अतिक्रमण मोहीम थांबविण्याच्या सूचना फलटण प्रांत अधिकारी यांना दिल्या.