सातारा जिल्ह्याला कर्जमाफीचे मिळाले २३३ कोटी ६३ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:28 AM2017-12-13T01:28:33+5:302017-12-13T01:31:42+5:30

सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ४१७ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

Satara district received 233 crore 63 lakh loan waiver | सातारा जिल्ह्याला कर्जमाफीचे मिळाले २३३ कोटी ६३ लाख

सातारा जिल्ह्याला कर्जमाफीचे मिळाले २३३ कोटी ६३ लाख

Next
ठळक मुद्देरक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू : १८१ कोटी २९ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यात जमा; जिल्हा उपनिबंधकांची माहितीकर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकºयांना या योजनेत सामावून घेण्यात आले आहे.

सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ४१७ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्याला आजपर्यंत २३३ कोटी ६३ लक्ष ६ हजार ९२८ रुपये प्राप्त झाले असून, यापैकी १८१ कोटी २९ लाख रुपये प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत,’ अशी माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम यांनी दिली आहे.

२६ हजार २६४ शेतकºयांचे कर्जमाफ झाले आहे. तसेच ३९ हजार ३३८ शेतकºयांना प्रोत्साहनपर लाभ मिळाला आहे. शेतकºयांसाठी कर्जमाफीची ही योजना कृषी व्यवस्थेला बळ पुरवणारी ठरली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांपर्यतचे कर्ज माफ करणे, नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकºयांना या योजनेत सामावून घेण्यात आले आहे.

योजनेच्या गतिमान व अचूक कार्यवाहीसाठी आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारी जिल्हा सहकारी बँक व विविध राष्ट्रीयकृत बँकांवर कर्जमाफीची रक्कम वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यासाठी नियुक्त कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. आॅनलाईन प्रक्रियेसाठी अद्ययावत यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे देशातील आजवरची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी गतीने होण्यास मदत झाली आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्ह्यात आतापर्यंत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला १५९३०८ शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी २१० कोटी २२ लक्ष ४७ हजार २७५ आणि राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांना ३ हजार ५६५ शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी २३ कोटी ४० लक्ष ५९ हजार ६५३ रुपये असे एकूण २३३ कोटी ६३ लक्ष ६ हजार ९२८ रुपये प्राप्त झाले आहेत. यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६२ हजार ३७ शेतकरी खातेधारकांच्या खात्यात १५७ कोटी ८८ लक्ष रुपये, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकेच्या ३ हजार ५६५ शेतकºयांच्या खात्यात २३ कोटी ४० लाख रुपये अशी
एकूण १८१ कोटी २९ लक्ष ३१ हजार ४६४ रुपये प्रत्यक्ष शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही गतीने सुरू आहे.
 

कर्जमाफीसाठी टप्प्या-टप्प्याने ग्रीन लिस्ट व कर्जमाफीची रक्कम प्राप्त होत आहे. आतापर्यंत एकूण तीन ग्रीन यादीनुसार कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यानुसार शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येत आहे.
- डॉ. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक

Web Title: Satara district received 233 crore 63 lakh loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.