सातारा जिल्ह्यात सारी आजारामुळे सहा जणांचा मृत्यू, धास्ती वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 06:56 PM2020-05-05T18:56:24+5:302020-05-05T19:11:50+5:30
कोरोना आजार झालेल्या व्यक्तीचा घसा तीव्र दुखतो, डोके दुखते, खोकला येतो, ताप येतो तसेच शेवटच्या टप्प्यात फुप्फुसांमध्ये जंतूचा त्रास सुरू होऊन फोटोस बंद पडते.
सातारा : कोरोनासोबतच सारी या संसर्गजन्य आजाराने जिल्ह्यात आता धास्ती वाढविली आहे. १ एप्रिल ते आजअखेर या आजारामुळे जिल्ह्यातील सहाजण दगावले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली.
जिल्ह्यातील २८३ संशयित रुग्णांना घशामध्ये तीव्र जंतुसंसर्ग झाला. त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले; परंतु यापैकी सहाजणांचा सारी या आजारामुळे उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
कोरोना आजार झालेल्या व्यक्तीचा घसा तीव्र दुखतो, डोके दुखते, खोकला येतो, ताप येतो तसेच शेवटच्या टप्प्यात फुप्फुसांमध्ये जंतूचा त्रास सुरू होऊन फोटोस बंद पडते. या शेवटच्या टप्प्यात ग्रस्त रुग्णाचा मृत्यू होतो. तर घशात तीव्र जंतुसंसर्ग झालेल्या व्यक्तीला सारी हा आजार घडल्याचे निरीक्षणात समोर आले आहे.
दोन्ही आजार हे संसर्गजन्य असल्याने लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरसोबत ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे. जितक्या जास्त वेळा आपण साबण किंवा हँडवॉशने हात धुणे अत्यावश्यक आहे.