सातारा, जावळीत शिवेंद्रसिंहराजे गटाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:40 AM2021-01-19T04:40:34+5:302021-01-19T04:40:34+5:30

सातारा : सातारा आणि जावळी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद सत्ता मिळवली. मतदानापूर्वीच काही ग्रामपंचायती ...

Satara, dominated by Shivendrasinhraje group in Jawali | सातारा, जावळीत शिवेंद्रसिंहराजे गटाचे वर्चस्व

सातारा, जावळीत शिवेंद्रसिंहराजे गटाचे वर्चस्व

googlenewsNext

सातारा : सातारा आणि जावळी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने निर्विवाद सत्ता मिळवली. मतदानापूर्वीच काही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. मतमोजणीनंतर सातारा आणि जावळी तालुक्यातील ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये विरोधी गटाला एकही जागा मिळाली नाही.

विजयानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाच्या विजयी उमेदवारांसह हजारो कार्यकर्त्यांनी सुरुची या निवासस्थानी जाऊन गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासनही दिले.

सातारा तालुक्यातील १३० ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. १३० पैकी ३७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार दि. १५ रोजी अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. निवडणूक निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार, पॅनेल प्रमुख आणि कार्यकर्ते हळूहळू सुरुची या निवासस्थानी गोळा होऊ लागले. निकाल जाहीर होताच त्या-त्या गावातील शेकडो लोक गुलालाची उधळण करत होते. सुरुची येथे जोरदार घोषणाबाजी करून एकच जल्लोष केला जात होता.

सातारा तालुक्यातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शेंद्रे (८-०), कोंडवे (१०-३), नागठाणे (१७-०), कळंबे (९-०), किडगाव (९-०), ठोसेघर (७-०), बोरगाव (११-०), परळी, सासपडे, नुने (४-३), डोळेगाव (५-२), शिवाजीनगर, कुमठे (७-०), वाढे (६-४), राकुसलेवाडी (५-०), सारखळ (५-२), नेले (५-२), पिलाणी (४-३), शिवाजीनगर, शेळकेवाडी, करंडी, परमाळे (४-३), काळोशी (५-२), वळसे, वेणेगाव, अंगापूर, कुसवडे (५-४), वर्ये, लावंघर, आरे, दरे, वनगळ, मापरवाडी, वेचले, नागेवाडी, कण्हेर, आगुंडेवाडी, अहिरेवाडी, खडगाव आदी बहुतांश सर्वच ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने झेंडा फडकवला.

जावळी तालुक्यातही अनेक ग्रामपंचायतींवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने वर्चस्व निर्माण केले. जावळी तालुक्यातील ७५ पैकी ३७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. या सर्वच ग्रामपंचायती आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विचाराच्या आहेत. ३८ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. निकालात तालुक्यातील सर्जापूर, सरताळे, कुडाळ, महिगाव, सनपाने, आलेवाडी, दरे बु., धोंडेवाडी, करंदोशी, काटवली, हातगेघर, पिंपळी, वहागाव, जरेवाडी, कोलेवाडी आदी ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाने बाजी मारली.

कुडाळमध्ये सौरभ शिंदे यांची सरशी

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या लढतीत आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे समर्थक सौरभ शिंदे यांच्या रयत पॅनेलने ७, वीरेंद्र शिंदे यांच्या पॅनेलच्या ४ जागा निवडून आल्या. विरोधी महाविकास आघाडीला ४ जागा मिळाल्यामुळे या ग्रामपंचायतीवरही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने सत्ता मिळवली.

फोटो ओळ-

सातारा येथील सुरुची या निवासस्थानी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

फोटोनेम :

3 Attachments

Web Title: Satara, dominated by Shivendrasinhraje group in Jawali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.