सातारा : वॉटर कपच्या तेरा केंद्रांवर गाव कारभाऱ्यांना पाण्याचे धडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:17 PM2018-03-05T13:17:25+5:302018-03-05T13:17:25+5:30
राज्यात तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, सहभागी गावातील कारभाऱ्यांना पाणी, जलसंधारणाचे प्रशिक्षण देण्यात येऊ लागले आहे. जिल्ह्यात यावर्षी १३ सेंटर सुरू असून, त्या माध्यामातून साताऱ्याबरोबरच पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील गाव कारभाऱ्याना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे. हे प्रशिक्षण १५ मार्चपर्यंत संपविण्यात येणार आहे.
सातारा : राज्यात तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, सहभागी गावातील कारभाऱ्यांना पाणी, जलसंधारणाचे प्रशिक्षण देण्यात येऊ
लागले आहे. जिल्ह्यात यावर्षी १३ सेंटर सुरू असून, त्या माध्यामातून साताऱ्याबरोबरच पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील गाव कारभाऱ्याना
मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे. हे प्रशिक्षण १५ मार्चपर्यंत संपविण्यात येणार आहे.
राज्यात गेली तीन वर्षे वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. सातारा जिल्ह्याचा सहभाग प्रत्येकवर्षी मोठा राहिलेला आहे. हा सहभाग लक्षात घेऊन
जिल्ह्यातील ट्रेनिंग सेंटरची संख्या तेरावर गेली आहे.
यापूर्वी कोरेगाव तालुक्यातील आठ केंद्रांवरच स्पर्धेत सहभागी असणाऱ्या गावातील लोकांना
प्रशिक्षण मिळायचे; पण वाढता सहभाग लक्षात घेऊन माण तालुक्यात चार आणि खटाव तालुक्यात एक सेंटर यावर्षी सुरू करण्यात आले आहे.
या सेंटरवरती जिल्ह्यातील सहभागी गावातील लोकांना ट्रेनिंग देण्यात येत आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावेही मार्गदर्शन घेऊन जात आहेत.
ट्रेनिंग सेंटर असणारी गावे
कोरेगाव तालुका- रुई, अनपटवाडी, नलवडेवाडी, न्हावी बुद्रुक, बिचुकले आदी.
माण- किरकसाल, कारखेल, लोधवडे, बिदाल. खटाव- भोसरे.