सातारा : दुष्काळी भागात पावसाचा धमाका, जोरदार वृष्टी : ११ तालुक्यांत २३४.७ मिलिमीटरची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:27 PM2018-06-09T13:27:32+5:302018-06-09T13:27:32+5:30
वरुणराजाने दुष्काळी भागावर वरदहस्त दाखविला आहे. दुष्काळी भागातील प्रमुख गावांमध्ये शुक्रवार, दि. 0८ रोजी सकाळी ७ ते ते शनिवार, दि. ९ सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये एकूण २३४.७ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाच्या धमाक्यामुळे दुष्काळी भागातील बंधारे, सीसीटी भरले आहेत.
सातारा : वरुणराजाने दुष्काळी भागावर वरदहस्त दाखविला आहे. दुष्काळी भागातील प्रमुख गावांमध्ये शुक्रवार, दि. 0८ रोजी सकाळी ७ ते ते शनिवार, दि. ९ सकाळी ७ वाजेपर्यंतच्या कालावधीत जिल्ह्यामध्ये एकूण २३४.७ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाच्या धमाक्यामुळे दुष्काळी भागातील बंधारे, सीसीटी भरले आहेत.
खंडाळा तालुक्यात १0५.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बरडमध्ये ७८ मिलीमीटर, तरडगावला ७२ मिलिमीटर, वाठार निंबाळकरला ६४ मिलिमीटर, पुसेगावला ५९.१ मिलिमीटर, मलवडीला ६४ मिलिमीटर, पिंपोडेत ५८ मिलिमीटर तर वाठार स्टेशनला ५३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
ही सर्वच गावे दुष्काळाशी सामना करण्यात वर्षानुवर्षे झगडत आहेत. मात्र नेमकी याच गावांमध्ये पाणी फांउडेशन, वॉटर कप तसेच जलयुक्त शिवार अशा विविध चळवळींच्या माध्यमातून बंधाऱ्यांची कामे, डोंगर उतारांवर सीसीटी
मोठ्या प्रमाणावर झाली आहेत.
पावसाने नेमकी याच दुष्काळी भागात वरदहस्त दाखविल्याने या भागातील शेतकरी आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहेत. पावसाचा जोर वाढल्यास या भागातील दुष्काळ कायमचा हद्दपार होऊ शकतो, असा
विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
तालुकानिहाय झालेल्या पावसाची आकडेवारी मिली मीटरमध्ये अशी :
सातारा : ११.५, जावली : १५.१, पाटण ६.७, कऱ्हाड : १३.३, कोरेगाव : ३0.६, खटाव : २२.३, माण :२१.६, फलटण : ४३.६, खंडाळा : ४४.३, वाई : १५.९, महाबळेश्वर : ९.७ एकूण : २३४.७