सातारा : खटाव तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोका, शेतकरी पिकं काढण्यात मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 04:06 PM2018-02-09T16:06:39+5:302018-02-09T16:11:17+5:30

खटाव तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील हरभरा काढणीस तसेच मळणीच्या कामात शेतकरी व्यस्त दिसून येत आहेत. त्यातच दोन दिवसापासून बदललेल्या हवामानाचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. जी पीके काढणीस योग्य झाली आहेत ती सुरक्षीत घरी आणण्यासाठी ची लगबग शिवारात दिसून येत आहे.

Satara: Due to cloudy weather in Khatav taluka, crops are threatened, farmers get rid of crops | सातारा : खटाव तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोका, शेतकरी पिकं काढण्यात मग्न

सातारा : खटाव तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोका, शेतकरी पिकं काढण्यात मग्न

Next
ठळक मुद्देखटाव तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोकाशेतकरी पिकं काढण्यात मग्न

खटाव (सातारा) : खटाव तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील हरभरा काढणीस तसेच मळणीच्या कामात शेतकरी व्यस्त दिसून येत आहेत. त्यातच दोन दिवसापासून बदललेल्या हवामानाचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. जी पीके काढणीस योग्य झाली आहेत ती सुरक्षीत घरी आणण्यासाठीची लगबग शिवारात दिसून येत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दोन दिवसांपासून हवेत अचानक झालेला बदल, पावसाळी वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहेत. तर हातातोडाशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे वाया जातील या भीतीमुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. काही ठिकाणी हरभरा पीक काढून ठेवले आहे. ते या वातावरणात सापडू नये यासाठी मळुन आणण्याची गडबड चालली आहे.

परिसरात दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण दिसू लागल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. या आभाळामुळे ज्वारी, कांदा, हरभरा पीकांवर किडींचा प्रादूर्भाव होऊन उत्पन्नात घट होणारच आहे. त्याहीपेक्षा पिकांचेही नुकसान होणार आहे. शेतमालाला भाव नसल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला या हवामानाचा फटका येणाऱ्या पीकाला बसण्याची भिती शेतकऱ्यातुन व्यक्त केली जात आहे. सध्याचे वातावरण पाहता रब्बी पीके धोक्यात.

Web Title: Satara: Due to cloudy weather in Khatav taluka, crops are threatened, farmers get rid of crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.