सातारा : पैशाच्या देवाणघेवाणीवरून राधिका चौकात एकावर चाकूने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:18 PM2018-05-12T13:18:40+5:302018-05-12T13:18:40+5:30
पैशाच्या देवाणघेवाणीवरून शुक्रवारी रात्री राधिका चौकात एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. यात इम्रान हरुण बागवान (वय २१, रा. मंगळवार पेठ) हा जखमी झाला असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : पैशाच्या देवाणघेवाणीवरून शुक्रवारी रात्री राधिका चौकात एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. यात इम्रान हरुण बागवान (वय २१, रा. मंगळवार पेठ) हा जखमी झाला असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, इम्रान बागवान या तरुणाचे राधिका चौकात कसवा मोबाईल शॉपी आहे. या दुकानामध्ये कैलास पिटेकर (रा. नामदेववाडी झोपडपट्टी) याचे येणे-जाणे असते.
दोघांमध्ये पैशांची घेवाण-देवाण होत होती. त्याच्यावरून दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याचा राग मनात धरून कैलासने शुक्रवारी रात्री नऊ वाजता इम्रानला शिवीगाळ केली. तसेच चाकूने हाताचे मनगट व पंजावर वार केले.
यात इम्रान जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार भोसले करीत आहेत.