सातारा :पाच वाहनांतून पन्नास गायी, बैलांची वाहतूक जनावरांची सुटका : वासरासह बैलाचा कोंडमाºयाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:03 PM2018-10-01T13:03:52+5:302018-10-01T13:08:31+5:30
गायी आणि बैलांची बेकायदा वाहतूक करणारी पाच वाहने पोलिसांसह युवकांनी पकडली. कत्तलीसाठी नेल्या जाणाºया सुमारे ४७ जनावरांची यावेळी सुटका करण्यात आली. मात्र, कोंडमारा झाल्यामुळे वाहनातच एका वासरासह बैलाचा मृत्यू झाल्याचे युवकांना दिसून आले.
आॅनलाईन लोकमत
ढेबेवाडी/मल्हारपेठ : गायी आणि बैलांची बेकायदा वाहतूक करणारी पाच वाहने पोलिसांसह युवकांनी पकडली. कत्तलीसाठी नेल्या जाणाºया सुमारे ४७ जनावरांची यावेळी सुटका करण्यात आली. मात्र, कोंडमारा झाल्यामुळे वाहनातच एका वासरासह बैलाचा मृत्यू झाल्याचे युवकांना दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी संबंधित वाहनाच्या चालकांना चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कºहाड-ढेबेवाडी मार्गावरून सोमवारी सकाळी जनावरांची बेकायदा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती ढेबेवाडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मालदन घाटात नाकाबंदी करून तीन टेम्पो अडविले. त्यामध्ये सुमारे तीस बैल आढळून आले. संबंधित वाहने पोलीस ठाण्यात नेण्यात आली. जनावरे टेम्पोतून खाली उतरविण्यात आली. त्यावेळी एका टेम्पोत गुदमरून बैलाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा कºहाड-पाटण मार्गावरून गायींची वाहतूक केली जाणार असल्याचे समजल्यानंतर नवारस्ता येथे युवकांनी दोन जीप अडविल्या. त्यामध्ये पंधरा देशी गायी आढळून आल्या. सर्व गायी युवकांनी जीपमधून खाली उतरविल्या. त्यावेळी एका वासराचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकांनी संबंधित जीपच्या चालकांना बेदम चोप दिला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाटण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी चालकांना ताब्यात घेतले. तसेच जनावरेही पोलीस ठाण्यात आणण्यात आली.