सातारा : आगीत छप्पर जळून खाक, लाखोंचे नुकसान; तीन तासांनंतर आगीवर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:05 PM2018-09-12T13:05:28+5:302018-09-12T13:07:47+5:30
घरातील दहा माणसं झोपेत असतानाच बुधवारी पहाटे घराने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे समजताच कुटुंबातील सदस्य सुरक्षित ठिकाणी गेले; परंतु संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. ही घटना जावळी तालुक्यातील गांजे येथे घडली.
Next
ठळक मुद्देआगीत छप्पर जळून खाक, लाखोंचे नुकसानतीन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण
मेढा (सातारा) : घरातील दहा माणसं झोपेत असतानाच बुधवारी पहाटे घराने अचानक पेट घेतला. आग लागल्याचे समजताच कुटुंबातील सदस्य सुरक्षित ठिकाणी गेले; परंतु संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. ही घटना जावळी तालुक्यातील गांजे येथे घडली.
याबाबत माहिती अशी की, गांजे येथे शांताराम गुरव, मारुती गुरव व ज्ञानेश्वर गुरव या भावंडांचे राहते घर आगीत जळून खाक झाले. आगीत धान्य, कपडे, भांडी, सोने, फर्निचर आदी साहित्य जळून खाक झाले.
आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.