सातारा : आधी मोडा... मग तोडा, वृक्षतोडीचा नवा फंडा : अजिंक्यतारा होतोय बोडका, वृक्षसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 05:08 PM2018-01-17T17:08:09+5:302018-01-17T17:12:39+5:30
कायद्याच्या कचाट्यात न सापडता शक्कल लढवून सध्या अजिंक्यतारा किल्ला परिसरात वृक्षतोड सुरू आहे. हिरवी फांदी मोडायची आणि मग ती वाळल्यावर तोडायची असा प्रकार बिनदिक्कत किल्ल्यावर सुरू आहे. वृक्षतोडीच्या या नव्या फंड्याने अजिंक्यतारा मात्र बोडका होऊ लागला आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धनासाठी आता सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
सातारा : कायद्याच्या कचाट्यात न सापडता शक्कल लढवून सध्या अजिंक्यतारा किल्ला परिसरात वृक्षतोड सुरू आहे. हिरवी फांदी मोडायची आणि मग ती वाळल्यावर तोडायची असा प्रकार बिनदिक्कत किल्ल्यावर सुरू आहे. वृक्षतोडीच्या या नव्या फंड्याने अजिंक्यतारा मात्र बोडका होऊ लागला आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धनासाठी आता सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
अजिंक्यताºयाच्या पायथ्याशी वसलेल्या सातारा शहराला किल्ल्याचा मोठा अभिमान. मात्र लोकवस्ती वाढेल तसे हे डोंगर बोडके होऊ लागले आहेत. याच किल्ल्याच्या पायथा व परिसरातील काहींनी सरपणासाठी किल्ल्यावरील वृक्षसंपदेवर घाला घातला आहे.
दुपारच्या सुमारास जाऊन फांद्या मोडायच्या आणि वाळल्या की तोडून न्यायचं त्यांचा हा फंडा आता वृक्षांच्याच मुळावर उठला आहे.|यासाठी तरुणाईने पुढे येऊन वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक ठरणार आहे.