सातारा पूर: जिल्ह्याचा पाऊस करणार २००५ ची पुनरावृत्ती !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 12:29 PM2019-08-08T12:29:56+5:302019-08-08T12:30:30+5:30

अजून दोन महिने बाकी : आतापर्यंत सरासरी ११०० मिलीमीटर पाऊस  

Satara Flood: Rainfall in the district will repeat 2005 flood | सातारा पूर: जिल्ह्याचा पाऊस करणार २००५ ची पुनरावृत्ती !

सातारा पूर: जिल्ह्याचा पाऊस करणार २००५ ची पुनरावृत्ती !

googlenewsNext

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने थैमान घातले असून आतापर्यंत वार्षिक सरासरी ओलांडून ११००  मिलीमीटरचा टप्पही पार केला आहे. त्यामुळे पावाळ्याचे अजून पावणे दोन महिने पाहता पावसाची वाटचाल ही २००५ च्या पर्जन्यमानाकडे सुरू असल्याचे दिसत आहे. कारण, त्यावेळी तब्बल २ हजार ८७ मिलीमीटर पाऊस झालेला. 

जिल्ह्यातील पावसाची जून ते सप्टेंबर दरम्यानच्या चार महिन्यातील पावसाची सरासरी  ८३४ मिलीमीटर आहे. त्या तुलनेत दरवर्षी कमी अधिक पाऊस पडत असतो. पण, यंदा या पावसाने वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडलीय.  ५ ऑगस्टपर्यंत पाऊस ९३६ मिलीमीटर होऊन ११२ टक्के सरासरी राहिलीय. तर ८ ऑगस्टच्या सकाळपर्यंत सरासरी १०९५ मिलीमीटर पाऊस पडलाय. यातील अधिक करुन पाऊस हा गेल्या दहा दिवसांतीलच आहे. 

सध्याचे प्रमाण पाहता पावसाची वाटचाल २००५ या वर्षाकडे सुरू असल्याचे दिसते. कारण, त्यावेळी पावसाळ्यात तब्बल २ हजार ८७ मिलीमीटर पाऊस झालेला. सातारा तालुक्यात १८२१ मिलीमीटर, जावळी २७०२, कोरेगाव १३९५, कºहाड ११८४, पाटण ३२८९, फलटण ४४९, माण ५४२, खटाव ६०५, वाई १५३७, महाबळेश्वरला ८६३९ तर खंडाळा तालुक्यात ७७८ मिलीमीटर पाऊस झालेला. 

२००५ वर्षासारखी आतापर्यंतच्या १४ वर्षात कधीच पर्जन्यवृष्टी झालेली नाही. कारण त्यानंतर २००६ ला जिल्ह्यात सरासरी १९५० मिलीमीटर पावसाची नोंद झालेली. तर २००७ ला १५१०, २००८ मध्ये ११६९, २००९ ला ११३६, २०१० ला १२९७, २०११ मध्ये १२८३, २०१३ ला ११२९, २०१४ मध्ये १२१६, २०१६ साली १२३७, २०१७ मध्ये ११८२ आणि २०१८ साली ११३२ मिलीमीटर पाऊस झाला होता.   

२०१५ ला कमी पाऊस...
गेल्या १४ वर्षांत फक्त २०१२ आणि १५ सालीच पाऊस कमी झालेला. १२ साली ९३१ तर १५ ला अवघा ७७५ मिलीमीटर पाऊस झालेला. त्यावेळी जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती होती.  
 

Web Title: Satara Flood: Rainfall in the district will repeat 2005 flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.