सातारा : बेकरी चालकास खंडणीसाठी गोडोलीत एकावर तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:17 PM2018-04-05T17:17:16+5:302018-04-05T17:18:36+5:30

गोडोली येथील बेकरी चालकास खंडणीसाठी एकावर तलवार हल्ला केल्याची घटना घडली.

Satara: Godavari sword raid for bakery driver | सातारा : बेकरी चालकास खंडणीसाठी गोडोलीत एकावर तलवार हल्ला

सातारा : बेकरी चालकास खंडणीसाठी गोडोलीत एकावर तलवार हल्ला

Next
ठळक मुद्देबेकरी चालकास खंडणीसाठी हल्लागोडोलीत एकावर तलवार हल्ला

सातारा : गोडोली येथील बेकरी चालकास खंडणीसाठी एकावर तलवार हल्ला केल्याची घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, गोडोली साईमंदिर चौकात असलेल्या शगून बेकरीमध्ये विकी अडसूळ व सोहेल शेख (रा. शाहूनगर, गोडोली) येथे आले.

त्यांनी बेकरी चालक अब्दुल अजीज शेख (वय ७०, रा. गोडोली) यांच्याकडे दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. ती देण्यास नकार दिल्याने विकी व सोहेल यांनी तलवारीसारख्या धारधार शस्त्राने धाक दाखवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

तसेच अब्दुल शेख यांच्यावर हल्ला करून जखमी केले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Satara: Godavari sword raid for bakery driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.