सातारा : मुख्याध्यापकाकडून विवाहितेचा विनयभंग, भाजप-सेना पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा केला होता दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 03:19 PM2018-05-30T15:19:45+5:302018-05-30T15:19:45+5:30
भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करणारा मुख्याध्यापक अमोल कोळेकर (रा. दिव्यनगरी, कोंडवे) याच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
सातारा : भाजप व सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करणारा मुख्याध्यापक अमोल कोळेकर (रा. दिव्यनगरी, कोंडवे) याच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत माहिती अशी की, साताऱ्यातील एका शाळेतील मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांना शासकीय विश्रामगृहात मारहाण करत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हरिदास जगदाळे, भाजपचे शहराध्यक्ष सुनील काळेकर व भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष संदीप मेळाट यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसऱ्या दिवशी अमोल कोळेकर याच्यावर एका महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यानंतर मंगळवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका महिलेने विनयभंगाची तक्रार दिली.
संबंधित महिला मुलाला शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेली असता कोळेकर याने महिलेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी तपास करीत आहेत.