कांदा उत्पादकाच्या मदतीला सातारकर सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 05:24 AM2018-12-08T05:24:30+5:302018-12-08T05:24:32+5:30
जिल्ह्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला एक रुपया किलो दराने कांदा विकावा लागला. त्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे यांनी पाच हजारांची आर्थिक मदत करून रामचंद्र जाधव यांच्या पायावरील शस्त्रक्रियेचे जबाबदारीही स्वीकारली.
Next
सातारा : जिल्ह्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याला एक रुपया किलो दराने कांदा विकावा लागला. त्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे यांनी पाच हजारांची आर्थिक मदत करून रामचंद्र जाधव यांच्या पायावरील शस्त्रक्रियेचे जबाबदारीही स्वीकारली. फलटण तालुक्यातील वेळोशी येथील रामचंद्र यांनी ४५० किलो कांदा एक रुपया किलोने विकला होता. सदाभाऊ खोत यांच्याकडून विचारपूस
‘लोकमत’ने मांडल्यानंतर सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी तातडीने कृषी व पणन विभागाच्या अधिकाºयांची बैठक घेऊन सकारात्मक पाऊल उचलण्याचे आदेश दिले. तसेच जाधव कुटुंबीयांची विचारपूस केली.