सातारा : गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल 59 लाखांची ऐतिहासिक भरपाई, विमा कंपनीला न्यायालयाचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 01:48 PM2018-03-11T13:48:42+5:302018-03-11T13:48:42+5:30

गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल एवढी मोठी नुकसान भरपाई सातारा जिल्ह्यातील न्यायालयांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या न्यायालयीन इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम

Satara: The historic compensation of 59 lakhs for the accidental death of the housewife, the court order to the insurance company | सातारा : गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल 59 लाखांची ऐतिहासिक भरपाई, विमा कंपनीला न्यायालयाचा आदेश 

सातारा : गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल 59 लाखांची ऐतिहासिक भरपाई, विमा कंपनीला न्यायालयाचा आदेश 

Next

सातारा : पूर्णवेळ गृहिणीचे काम करणा-या विवाहित महिलेच्या अपघाती मृत्यूनंतर तिच्या वारसांना ५९ लाख नुकसान भरपाई म्हणून विमा कंपनीने द्यावी, असा महत्त्वपूर्ण निर्णय क-हाड येथील जिल्हा न्यायालयाने दिला.

स्वत:चे कोणतेही उत्पन्न नसलेल्या व संसारी स्त्रीच्या भूमिकेतून दिवसरात्र स्वत:च्या कुटुंबासाठी कार्यमग्न असलेल्या गृहिणीच्या अपघाती मृत्यूबद्दल एवढी मोठी नुकसान भरपाई सातारा जिल्ह्यातील न्यायालयांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या न्यायालयीन इतिहासातील आजपर्यंतची सर्वात मोठी रक्कम ठरली आहे.

अर्जदारांतर्फे काम पाहिलेले अ‍ॅड. राजेंद्र वीर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, क-हाड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप महादेव गुरव हे त्यांची पत्नी वैशाली, मुलगी प्रतीक्षा आणि मुलगा प्रतीक यांच्यासह कारमधून दार्जीलिंगकडे जात होते. जात असताना वाटेत राईगंज शहराजवळ त्यांच्या कारची व समोरून आलेल्या मालट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दिलीप गुरव यांच्यासह त्यांची पत्नी वैशाली व मुले गंभीर जखमी झाली होती. या अपघातातून दिलीप गुरव व मुले बचावली; परंतु वैशाली यांना प्राणघातक दुखापती झाल्याने त्यांचा दुस-या दिवशी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला.

या दोन्ही वाहनांचा विमा न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीकडे उतरविण्यात आला होता. त्यामुळे या अपघाती मृत्यूबद्दल नुकसान भरपाई मिळावी म्हणून वैशाली यांचे वारस असलेल्या दिलीप गुरव व त्यांच्या मुलांनी क-हाड येथील जिल्हा न्यायालयात नुकसान भरपाई मिळण्याबाबत अर्ज दाखल केला होता.

गुरव यांनी दिलेल्या अर्जात, वैशाली या पूर्णवेळ गृहिणी होत्या. त्यामुळे त्यांना स्वत:चे कोणतेही उत्पन्न नव्हते. अश गृहिणींच्या अपघाती मृत्यूबद्दल भरपाईच्या केसेसमध्ये गृहिणींचे उत्पन्न निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने व मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमध्ये घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अशा गृहिणीच्या कमवत्या पतीच्या उत्पन्नाचा विचार होऊन पतीच्या उत्पन्नाच्या एक तृतीअंश इतकी रक्कम गृहिणीचे गृहित उत्पन्न मानण्यात येते. अ‍ॅड. राजेंद्र वीर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय व मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचा आधार घेऊन या कामी अर्जदारांची बाजू मांडताना कोर्टापुढे असे नमूद केले की, दिलीप गुरव हे बँकेत अधिकारी असून, अपघताच्या वेळी त्यांना दरमहा एक लाखांपेक्षा जास्त पगार होता. त्यामुळे स्वत:चे कोणतेही उत्पन्न नसलेल्या त्यांच्या पत्नी वैशाली यांचे गृहित उत्पन्न हे त्यांच्या पगाराच्या कमीत कमी एक तृतीअंश इतके म्हणजेच ३३ हजार दरमहा इतके धरून त्यानुसार अर्जदारांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. अर्जदारांच्या मागणीला विमा कंपनीतर्फे जोरदार विरोध करण्यात येऊन अशा गृहिणीचे गृहित उत्पन्न जास्तीत जास्त दरमहा ३ हजार इतके धरावे, असे अर्जात नमूद करण्यात आले होते.

वैशाली यांची साथ, प्रोत्साहन व पार पडलेल्या कौटुंबिक जबाबदा-यांमध्ये यांचा मोलाचा वाटा होता. या बाबींचा विचार करून कºहाड येथील दुसरे जिल्हा न्यायाधीश सी.पी. गड्डम यांनी वैशाली यांचे गृहित उत्पन्न दरमहा ३३ हजार इतके धरून त्यानुसार एकूण ४४ लाख अधिक अर्ज दाखल तारखेपासून होणारे व्याज १५ लाख अशी एकूण ५९ लाख इतकी नुकसान भरपाई अर्जदार दिलीप गुरव व मुलांना न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीने द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

Web Title: Satara: The historic compensation of 59 lakhs for the accidental death of the housewife, the court order to the insurance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.