सातारा :जखिणवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 05:04 PM2018-11-14T17:04:32+5:302018-11-14T17:06:16+5:30

जखीणवाडी, ता. कऱ्हाड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी जागीच ठार झाली. मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्वप्नील भिंगारदेवे यांच्या गोशाळेत ही घटना घडली.

Satara: In the injured hood, the goat is killed in a leopard attack and villagers are worried | सातारा :जखिणवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

सातारा :जखिणवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार, ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

Next
ठळक मुद्देजखिणवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठारग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

कऱ्हाड : जखीणवाडी, ता. कऱ्हाड येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी जागीच ठार झाली. मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्वप्नील भिंगारदेवे यांच्या गोशाळेत ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जखीणवाडी, ता. कऱ्हाड येथे स्वप्नील भिंगारदेवे यांची गोशाळा आहे. गोशाळेच्या शेजारी असलेल्या एका शेतकऱ्याने सोयीसाठी म्हणून आपली एक शेळी भिंगारदेवे यांच्या गोशाळेत मंगळवारी रात्री बांधली होती.

रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गोशालेतील कामगारास गायींचा हंबरडा सुरू असलेला ऐकू आला. यानंतर कामगाराने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता बिबट्याने शेळीवर हल्ला करून तिला ठार मारल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
कामगाराने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. तसेच परिसरातील नागरिकांना बोलविले.

नागरिकांसह सर्वांनी फटाके वाजविले. फटाक्यांच्या आवाजाने बिबट्या त्या ठिकाणाहून पळून गेला. या घटनेमुळे जखीनवाडी पसिरातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Web Title: Satara: In the injured hood, the goat is killed in a leopard attack and villagers are worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.