सातारा : दुचाकीच्या इंजिनमध्ये टाकला लोखंडाचा चुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 02:07 PM2018-07-07T14:07:57+5:302018-07-07T14:12:04+5:30

सातारा बसस्थानकासमोरील पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये लावण्यात आलेल्या दुचाकीच्या इंजिनमध्ये चक्क लोखंडाचा चुरा टाकण्यात आल्याने दुचाकीस्वाराला दहा हजारांचा आर्थिक फटका बसला. पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये गाडी लावली असतानाही हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

Satara: Iron rod in a two-wheeler engine | सातारा : दुचाकीच्या इंजिनमध्ये टाकला लोखंडाचा चुरा

सातारा : दुचाकीच्या इंजिनमध्ये टाकला लोखंडाचा चुरा

ठळक मुद्देसातारा : दुचाकीच्या इंजिनमध्ये टाकला लोखंडाचा चुराबसस्थानकासमोरील घटनेने खळबळ : अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा

सातारा : बसस्थानकासमोरील पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये लावण्यात आलेल्या दुचाकीच्या इंजिनमध्ये चक्क लोखंडाचा चुरा टाकण्यात आल्याने दुचाकीस्वाराला दहा हजारांचा आर्थिक फटका बसला. पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये गाडी लावली असतानाही हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शाहूपुरी येथे राहणारे रोहित भूतकर हे रविवारी बसस्थानकासमोरील पे अ‍ॅण्ड पार्कमध्ये दुचाकी लावून काही कामानिमित्त कऱ्हाडला गेले होते.

सायंकाळी परत आल्यानंतर त्यांच्या दुचाकीच्या आॅईल कॅपमधून इंजिनमध्ये लोखंडाचा चुरा टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गाडीचे इंजिन अचानक लॉक झाले. गॅरेजला गाडी नेण्यात आल्यानंतर मिस्त्रीने गाडीचे इंजिन खोलले. त्यावेळी सर्व इंजिनमध्ये लोखंडी चुरा असल्याचे दिसून आले.

हा प्रकार नेमका कुणी केला, हे अद्याप समोर आले नाही. भूतकर यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. बसस्थानकासमोरील पे अ‍ॅण्ड पार्कमधील सीसीटीव्ही ही बंद असल्यामुळे याचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

Web Title: Satara: Iron rod in a two-wheeler engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.