सातारा : जिहे-कठापूर योजनेला ८०० कोटी मिळाले, ही माहिती चुकीची, तत्वत: मंजूरी म्हणजे निधी मिळाला असे नाही : शिवतारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:26 PM2018-01-05T13:26:55+5:302018-01-05T13:33:30+5:30
जिहे-कठापूर योजनेला ८०० कोटी मिळाले, ही माहिती चुकीची आहे. तत्वत: मंजुरी म्हणजे निधी मिळाला, असे होत नाही. प्रस्तावित गोष्टी जाहीर करणे चुकीचे आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
सातारा : जिहे-कठापूर योजनेला ८०० कोटी मिळाले, ही माहिती चुकीची आहे. तत्वत: मंजुरी म्हणजे निधी मिळाला, असे होत नाही. प्रस्तावित गोष्टी जाहीर करणे चुकीचे आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. पुसेगाव येथे भाजपचे महेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन जिहे-कठापूर योजनेला ८०० कोटी निधी मिळाल्याची घोषणा केली होती. याबाबत वस्तुनिष्ठ माहिती मिळावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.
आमदार जयकुमार गोरे यांनीही जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. पाणी ही दुष्काळी जनतेची निकडीची गरज आहे.
पालकमंत्री विजय शिवतारे याबाबत बोलताना म्हणाले, आठशे कोटी मिळाल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. माहिती देणाऱ्यांशी मी बोललो. मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली, असे सांगितले.
त्यांना तत्वत: मान्यता आणि निधि मिळणे यात फरक असल्याचे मी त्यांना सांगितले. आमदारांना तत्वत: मान्यता कशी मिळते, हे माहिती असते. चुकीची माहिती देवून संभ्रम निर्माण करु नका.ह्ण