सातारा, कऱ्हाड, खंडाळा, दहिवडी पुन्हा एकदा ‘जय मल्हार’

By admin | Published: September 1, 2014 10:23 PM2014-09-01T22:23:26+5:302014-09-01T23:08:07+5:30

जिल्ह्यात सरकारचा निषेध : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक

Satara, Karhad, Khandala, Dahivi once again 'Jai Malhar' | सातारा, कऱ्हाड, खंडाळा, दहिवडी पुन्हा एकदा ‘जय मल्हार’

सातारा, कऱ्हाड, खंडाळा, दहिवडी पुन्हा एकदा ‘जय मल्हार’

Next

सातारा : आरक्षणाच्या मागणीवरून धनगर समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून जिल्ह्याच्या अनेक भागात या अनुषंगाने आंदोलने झाली. सातारा, कऱ्हाड, खंडाळा, दहिवडी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी ‘येळकोट-येळकोट जय मल्हार’चा नारा घुमला. कार्यकर्त्यांवर दाखल होत असलेल्या गुन्ह्यांबद्दलही निषेध करण्यात आला. सातारा येथे अहिल्या सामाजिक विकास संस्थेच्यावतीने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना निवेदन देण्यात आले.
आरक्षणाच्या अनुषंगाने भूमिका मांडण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सहा दशकापासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. आमच्या न्याय मागण्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलने केली आहेत. तरीही आमच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे आमच्या मागण्याचा गांभीर्याने विचार करावा. निवेदन देतेसयमी मारुती जानकर, बबन अवकिटकर, अशोक माने, संजय अवकिटकर, प्रकाश माने, बजरंग अवकिटकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Satara, Karhad, Khandala, Dahivi once again 'Jai Malhar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.