सातारा : कऱ्हाडात शिवजयंती सोहळा, जय शिवाजी, जय भवानीचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 04:01 PM2018-04-17T16:01:41+5:302018-04-17T16:01:41+5:30
कऱ्हाड शहर व परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. दरम्यान, बुधवार, दि. १८ एप्रिल रोजी शहरात दरबार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील दत्तचौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, सर्वत्र जय शिवाजी, जय भवानीचा गजर घुमू लागला आहे.
कऱ्हाड : कऱ्हाड शहर व परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. दरम्यान, बुधवार, दि. १८ एप्रिल रोजी शहरात दरबार मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. येथील दत्तचौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, सर्वत्र जय शिवाजी, जय भवानीचा गजर घुमू लागला आहे.
मंगळवारी शहरातील पाटण कॉलणी, चावडी चौक, आझाद चौक, शाहू चौक, दत्तचौक या चौकांसह शहरातील इतर चौकांमध्ये शिवसैनिकांकडून मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली. सकाळपासून शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने शहरातील दत्तचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.
जय शिवाजी जय भवानी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा विविध घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी यावेळी करण्यात आली. यानंतर शिवसैनिकांकडून टाऊन हॉल, विजय दिवस चौक, बसस्थानक, दत्त चौक, आझाद चौकमार्गे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. शिवसैनिकांच्या घोषणांनी तसेच पोवाड्यांनी दत्तचौक व चावडी चौक परिसर दुमदुमून गेला होता.
हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने प्रती वर्षीप्रमाणे बुधवारी शिवजयंतीनिमित्त सायंकाळी पाच वाजता शहरातून शाही दरबार मिरवणूक काढली जाते. या दरबार मिरवणूकीस दरवर्षी हजारोंच्या संख्येने जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शिवसैनिक कऱ्हाडात हजेरी लावतात.याहीवर्षी हिंदू एकताच्यावतीने दरबार मिरवूणक काढण्यात येणार असून मिरवणूकीत विविध चित्ररथांचा सहभाग असणार आहे.