सातारा : पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यावर चाकू हल्ला, घटनेमुळे साताऱ्यात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:56 PM2018-09-21T12:56:38+5:302018-09-21T12:57:42+5:30
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीतील एका हॉटेलसमोर कृष्णा खोरे पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यावर शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी चाकू हल्ला करून जखमी केले. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली.
सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीतील एका हॉटेलसमोर कृष्णा खोरे पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यावर शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी चाकू हल्ला करून जखमी केले. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली.
याबाबत माहिती अशी की, कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या जिहे-कठापूर योजनेतील अभियंता विनोद विजय मुजाप्पा (वय ३९) हे गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आॅफिसर क्लबमध्ये आले होते. त्यानंतर साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते पुन्हा घरी आदित्यनगरी, खेड येथे कारमधून जात होते.
विसावा नाक्यावरून ते सर्व्हिस रोडने जात असताना महिंद्रा एक्झिकेटिव्ह हॉटेलसमोर पुणे बाजूकडून एक कार आडवी आली. कारमधून दोघेजण खाली उतरले.
त्या दोघा अज्ञातांनी विनोद मुडाप्पा यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात मुडाप्पा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालय परिसरात पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.